कोपरगावात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

कोपरगाव/प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे व हिंदू सम्राट संघटना येवला रस्ता शाखेच्यावत...

कोपरगाव/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे व हिंदू सम्राट संघटना येवला रस्ता शाखेच्यावतीने शहरातील साईबाबा कॉर्नर येथील आमदार आशुतोष काळे यांनी उभारलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना नुकतेच फळांचे वाटप करण्यात आले.

मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे, अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक बापू काकडे, उपाध्यक्ष अनिकेत खैरे, मनसेचे नवनाथ मोहिते यांसह मनसे पदाधिकारी व हिंदू सम्राट संघटनेचे सदस्य कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित होते. दरम्यान, राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तरुणांनी रक्तदान शिबिर व रुग्णांना फळे वाटप केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत