राहुरी : सचिन शेजुळ आपल्या राजकीय कारकिर्दीत भगव्याशी इमान राखून शिवसेनेसाठी तनमनधनाने स्वतःला वाहून घेतलेले आणि दरवर्षी पायी शिर्डी...
राहुरी : सचिन शेजुळ
आपल्या राजकीय कारकिर्दीत भगव्याशी इमान राखून शिवसेनेसाठी तनमनधनाने स्वतःला वाहून घेतलेले आणि दरवर्षी पायी शिर्डी पालखी नेऊन साई चरणी नतमस्तक होणारे सेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या पक्षावरील 'श्रद्धेला' आणि कोणतेही मोठे पद मिळालेले नसतानाही दाखवलेल्या 'सबुरीला' आता फळ मिळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिर्डीच्या साई संस्थांनच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीत खेवरे यांना संधी देऊन शिवसेनेकडे 'देर है मगर अंधेर नहीं' हे पहायला मिळणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेकडे रावसाहेब खेवरे हे एक अजब रसायन आहे. शेतकरी हिताचे प्रश्न असो की, सर्व सामान्य घटकांच्या समस्या, तसेच पाणी प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, ऊस दर, कांद्याचे भाव याबाबत खेवरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच आवाज उठवला आहे. यातून शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याने सेनेची प्रतिमा उंचावून शिवसेना हा आपला पक्ष म्हणून जनतेची याकडे ओढ वाढली आहे. याशिवाय, उत्तरेत 'गाव तिथे शिवसेना, आणि घर तिथे शिवसैनिक' ही संकल्पना राबवून त्यांनी तळागाळात पक्ष वाढवला आहे. वयाच्या 17 व्या वर्षांपासून त्यांनी शिवबंधन हातात बांधून पक्षाला मजबुती देण्याचे हे काम आजपर्यंत अविरतपणे सुरू ठेवले आहे.
नगर जिल्ह्यात शिवसेना म्हंटल की 'खेवरे' अशी जनमानसात ओळख निर्माण झाली आहे. मात्र मोठी लोकप्रियता आणि जनतेत कामे असतानाही त्यांना दुर्दैवाने मोठी संधी मिळाली नाही. त्यांना 2014 ला आमदारकी खुणावत असताना त्यांनी पक्ष हितासाठी तनपुरे कुटुंबाला उमेदवारी देऊन पुन्हा मोठा त्याग केला. आतापर्यंत पक्षासाठी इमाने इतबारे काम करत असताना त्यांना मोठे पद मात्र मिळाले नाही, मात्र तरीही ते खचले नाहीत. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आणखी वेगाने काम केले. मुळात शिर्डीच्या साईबाबांवर त्यांची अमाप श्रद्धा असल्याने आपोआपच ' श्रद्धा आणि सबुरी'चे गुण त्यांच्याकडे आले. खेवरे यांनी राहुरी ते शिर्डी पायी पालखी सोहळा सुरू करून हजारो साई भक्तासह ते पायी दर्शनासाठी वारीत जातात.आजही दरवर्षी हा सोहळा सुरू असून त्यात न चुकता खेवरे नाना हे सर्वात पुढे असतात. त्यांची बाबांवरील श्रद्धा खरोखरच कौतुकास्पद असून, त्यांचा संयम आणि प्रसंगीचा आक्रमकपणा हा शिवसैनिकाना ताकद आणि प्रेरणा देणारा आहे. आज ना उद्या आपल्या नेत्याला कामाचे फळ नक्की मिळेल, अशी खात्री तमाम शिवसैनिकांना आहेच.आणि आता ही वेळ आली आहे. साई संस्थान विश्वस्त पदाच्या होणाऱ्या निवडीत आता खेवरे यांना संधी मिळणार आहे, ही संधी मिळाल्यास खर्याअर्थाने त्यांना न्याय मिळणार असल्याची भावना समस्त शिवसैनिक व्यक्त करत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नक्कीच आपल्या प्रामाणिक शिवसैनिकाला साई संस्थानवर संधी देतील, असा विश्वास शिवसैनिक आणि तमाम नगरकर करत आहेत. यातून शिवसैनिकांची पक्षावरील श्रद्धा आणखी दृढ होणार हे नक्की.
छत्रपती प्रतिष्ठानचा मुख्यमंत्र्यांना ठराव..! नगर जिल्ह्यातील शिर्डी हे जागतिक देवस्थान आहे. या देवस्थानावर खरोखरचं साई भक्त आणि पक्षावर निष्ठा असलेल्या पै रावसाहेब खेवरे यांची वर्णी लावावी, या मागणीसाठी उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानने मुख्यमंत्र्यांना संस्थेचा तसा ठराव पाठवला आहे, तसेच राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका उपप्रमुख कैलास अडसुरे आणि दिपकराव पंडित आदी शिवसैनिकांनी यासाठी पक्षाकडे साकडे घातले आहेत


कोणत्याही टिप्पण्या नाहीत