राहुरी/वेबटिम राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी मोहीम सप्ताहाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या...
राहुरी/वेबटिम
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी मोहीम सप्ताहाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतीमध्ये जावून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मंगळवारी सकाळी ११ वाजता आरडगाव येथील शेतकरी भाऊसाहेब आढाव यांच्या शेतीच्या कपाशी प्लॉटवर जात कृषी पर्यवेक्षक तुळशीराम पवार, मंडल कृषी अधिकारी प्रशांत ढवळे, कृषी सहाय्यक चंद्रकांत म्हसे, भीमराज गडदे,बाळासाहेब सुळ आदींनी प्रत्यक्ष शेतीत जाऊन प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये शासकीय खतांचा वापर कमी करून उत्पन्न वाढवणे तसेच रोग नियंत्रण कीड नियंत्रण आदीसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक किशोर वने,पोपट जाधव,पोपट झुगे, रमेश वने बांपुसाहेब धसाळ, केशव म्हेसे, श्रीकांत वने, आनंद वने, गणेश झुगे, चंद्रकांत ढेरे, भास्कर वने, दत्तात्रय साळुंके, कुशाबांपू ढेरे, राजेंद्र झुगे, भारत गुंजाळ ,प्रभाकर बोबडे, प्रकाश बोबडे ,सुभाष चौधरी, उत्तम वने, सिद्धांत वने, अमोल झुगे, आकाश आढाव ,सुधाकर गागरे,धनंजय सर्पे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत