सात्रळ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

सात्रळ(वेबटीम) लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने  सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व व...

सात्रळ(वेबटीम)

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने  सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक प्रा. हरिदास हजारे, प्रा. श्रीकृष्ण लोंढे , प्रा. सुरेश सानप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन  साजरा करण्यात आला.

       याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप,कार्यालयीन अधिक्षक श्री. विलास शिंदे, स्टाफ व सेवक वृंद उपस्थित होते.यावेळी उपस्थिताकडून वाॅर्मअप, योगा, प्राणायाम,पद्मासन ,ताडासन,सिद्धासन,वज्रासन,वक्रासन,वृक्षासन, त्रिकोणासन,धनुरासन,आकर्ण धनुरासन,भुजंगासन, हलासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, सर्वांगासन इत्यादी आसन ऑफलाइन करवून घेण्यात आली.

        याप्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डाॅ. सोमनाथ घोलप म्हणाले की,२१ जून हा या वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. २१ व्या शतकात माणूस भौतिक सुखांच्या मागे धावत आहे. या धावपळीमध्ये त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य ढासळत आहे. मानवी शरीर आणि मनावर अनेक रोगांची अतिक्रमणे वाढायला लागली आहेत. या साऱ्यांपासून मानवाची सुटका व्हावी व संपूर्ण मानवजातीच्या सुखासाठी प्राचीन भारतीय काळापासून चालत आलेली योग विद्येची परंपरा उपयोगात येऊन मानवी जीवन संपन्न व्हाव म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना पुढे आली. जगात शांतता निर्माण करण्यासाठी योग हा खूप महत्वाचा ठरू शकतो.

      महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप म्हणाले,योग ही भारतातील ५००० वर्षे  जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. योगसाधनेत सातत्य आणि नियमितता ठेवल्यास जीवन आनंददायी होते. 

       प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण देत असताना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. हरिदास हजारे  म्हणाले, शरीराबरोबरच मनाचे आरोग्य सुधृढ व्हावे, मानसिक चैतन्य, इच्छाशक्ती, स्वतःचा शोध घेता यावा; यासाठी योग साधना केली जाते. योगासने ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. ह्या वेगवेगळ्या योगासनांचा शरीराचा वेगवेगळ्या भागांना फायदा होतो.

     प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक प्रा. हरिदास हजारे यांनी केले. आभार प्रा. श्रीकृष्ण लोंढे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत