महाविकास आघाडीत अखेर नासलं; शिवसेनेच्या संजय राऊत यांचा राष्ट्रवादीला इशारा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महाविकास आघाडीत अखेर नासलं; शिवसेनेच्या संजय राऊत यांचा राष्ट्रवादीला इशारा

 पुणे :वेबटीम खेड पंचायत समितीच्या सदस्यांच्या पळवापळवीवरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती ...

 पुणे :वेबटीम


खेड पंचायत समितीच्या सदस्यांच्या पळवापळवीवरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. पंचायत समितीच्या या बंडखोरीमागे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंचा हात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना खुलं आव्हान केलं आहे.


महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कारभार योग्यरित्या सुरु असताना खेडमध्ये जे घाणेरडं राजकारण सुरु आहे, ते आघाडीला शोभा देणारं नाही.  पुण्यात कुरघोडी करणारी लोक आहेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त हा अजित पवारांनी करावा. खेडचे आमदार अजित पवारांचं ऐकत नसतील तर खेडपुरतं किंवा पुणे जिल्ह्यापुरतं काय करायचं ते आम्ही बघू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


आम्हालाही माणसं फोडता येतात पण आपण एकदा नियमात बांधलो गेलो असल्याने आम्ही ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर काय करायचं हे आम्ही पाहू, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.


दरम्यान, मोहिते यांची वागणूक अशीच असेल तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो की नसो, इथे मात्र शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून येईल, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत