कोपरगाव/प्रतिनिधी कोविडची दुसरी लाट ओसरु लागली असून, कोपरगाव शहर व तालुक्यातीलही रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तत्पूर्वी शासनाने जाहीर केलेल...
कोपरगाव/प्रतिनिधी
कोविडची दुसरी लाट ओसरु लागली असून, कोपरगाव शहर व तालुक्यातीलही रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तत्पूर्वी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शहरातील छोट्या-मोठ्या व्यापार्यांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य केले आहे. मात्र सततच्या लॉकडाऊनमुळे उपजीविकेचे साधनच बंद राहिल्याने संसाराचा गाडा चालविणे अतिशय अवघड झाले. त्यासाठी 7 ते 2 वेळेत दुकाने उघडण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घ्यावी, अशी मागणी कोपरगाव व्यापारी समितीने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
कोरोना संकटकाळात राज्य शासनाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. यामध्ये अत्यावश्यक वगळता इतर आस्थापना व व्यवसायांना मनाई करण्यात आली आहे. परंतु सततच्या लॉकडाऊनमुळे छोट्या-मोठ्या व्यापार्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत आटला आहे. यामुळे घर चालविणेही मुश्किल झाले आहे. यापूर्वी देखील व्यापारी समितीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे संपूर्ण वस्तुस्थिती मांडली होती. आता तरी जिल्हा प्रशासनासोबत होणार्या बैठकीत कोपरगावच्या सद्यस्थितीची माहिती द्या आणि शहरासह तालुक्यातील दुकाने 7 ते 2 यावेळेत उघडण्यास परवानगी मागा, अशी मागणी कोपरगाव व्यापारी समितीचे शरद खरात, अकबर शेख, निसार शेख, अजय विघे, संजय खरोटे, किशोर बागुल, विशाल लकारे, संदीप जाधव, अर्जुन पंडोरे, तिलकराज लोंगाणी, तिलकराज अरोरा, नारायण सारंगधर, दिलीप गव्हाणे, राधेश्याम लोंगाणी, विजय कासलीवाल, शुभम कोठारी, सुमित राजपाल, गौरव ठकराल, एम.बी.भुजबळ, रियाण मणियार, वाल्मिक शुक्ला आदी व्यापार्यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत