बिडच्या पोलीसांनी राहुरीतील खूनाचा केला उलगडा.. खुन झालेली तरूणी निघाली नाशिकची - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बिडच्या पोलीसांनी राहुरीतील खूनाचा केला उलगडा.. खुन झालेली तरूणी निघाली नाशिकची

देवळाली प्रवरा/वेबटीम:-   राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ १४ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून केलेल्या निर्घृण ...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

 राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ १४ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून केलेल्या निर्घृण खून झाला होता. त्या खुनाला चार महिन्यांनी वाचा फुटली. या घटनेतील आरोपीने पंधरा दिवसांपूर्वी आणखी एक खून केला. त्यात, पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बिडच्या पोलीसांच्या चौकशीत राहुरीतील खुनाचा उलगडा झाला. आरोपीने राहुरी फॅक्टरी येथे मित्राच्या मदतीने केलेल्या खुनाची कबुली दिली. 

                 बिड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील विशाल कुलथे या सराफाचा खुन करण्यात आला. या खुनाच्या गुन्ह्यात दोघां जणांना अटक केल्या नंतर ज्ञानेश्वर गायकवाड याचे नाव पुढे आले.त्यास बुधवारी नाशिक येथुन अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड व केतन लोमटे (दोघेही रा. शिरुर कासार, जि. बीड)  या दोघांनी राहुरी तालुक्यातील राहुरी फँक्टरी येथे गुंजाळ नाक्या लगत  शीतल भामरे (रा. गाडेकर मळा, नाशिक) या तरुणीच्या डोक्यात दगड घालुन खुन करण्यात आला.

           आरोपी ज्ञानेश्वर मूळचा भातकुडगाव (ता. शेवगांव) येथील रहिवासी. गावात मुलींची छेड काढत असल्याने घरच्यांनी त्याची रवानगी मामाकडे शिरूर कासार येथे केली. त्याची सोशल मीडियातून शीतल भामरे या विवाहितेची ओळख झाली. तिला दोन मुले. तिचे ज्ञानेश्वरसोबत प्रेम जमल्याने सहा महिन्यांपूर्वी तिने शिरूर कासार गाठले. दोघे "लिव्ह इन रिलेशनशिप"मध्ये राहू लागले. परंतू काही दिवसा नंतर चारित्र्याच्या संशयावरून शितलला त्रास सुरू झाल्याने तिने नाशिकला सोडण्यास सांगितले. ज्ञानेश्वरने नाशिकला जातांना मित्र केतन लोमटेच्या मदतीने राहुरी फॅक्टरी येथे चिंचविहिरे शिवारातील गणेश देशमुख यांच्या शेतात प्रेयसी शीतलचा डोक्‍यात दगड घालून खून केला. मागील अडीच महिन्यांपासून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके खुनाचा तपास करीत होते. परंतु, तरुणीची ओळख पटत नव्हती. त्यामुळे तपास थंडावला होता.

            दरम्यान, आरोपी ज्ञानेश्वरने एप्रिल महिन्यात पुन्हा दुसर्‍या मुलीशी लग्न केले. पत्नीला दागिने खरेदी केले. सराफ व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे (वय २५, रा. शिरुर कासार) याला दागिने घेऊन घरी बोलावले. त्याचा पंधरा दिवसांपूर्वी खून केला. मृत विशालला वडील नाहीत. वृद्ध आजोबा सुधाकर जगन्नाथ कुलथे (वय ७०) नातवाच्या खुनाच्या धक्काने मृत्यू पावले.

            विशालचा मृतदेह आरोपीने मामाच्या दुचाकीवरून भातकुडगाव (ता. शेवगाव) येथे स्वतःच्या शेतात नेऊन पुरला. मामाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. भीतीपोटी आरोपीचे मामा अजिनाथ गायके (रा. शिरुर कासार) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी दोन खून व दोन मृत्यूस कारणीभूत ठरला.




प्रेयशीच्या खुनात वर्ग करण्यासाठी न्यायालयात अर्ज


            मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याने प्रेयसी शीतल भामरे हिचा राहुरी फॅक्टरी येथे खून केल्याची कबुली दिली आहे. शिरूर कासार (जि. बीड) येथे विशाल कुलथे यांच्या खून प्रकरणात आरोपी पोलीस कोठडीत आहे. दोन दिवसांनी कोठडी संपल्यावर आरोपीला राहुरी फॅक्टरी येथील खून प्रकरणात अटक करण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला जाईल.


- संदीप मिटके, पोलीस उपअधीक्षक, श्रीरामपूर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत