कोपरगाव/वेबटीम :- कोविडच्या संकटात गोरगरीबांची उपासमार टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक सहाय्य योजना तर पंतप्रधानांनी गरीब...
कोपरगाव/वेबटीम :-
कोविडच्या संकटात गोरगरीबांची उपासमार टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक सहाय्य योजना तर पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजनांची निर्मिती केली आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतूने कोपरगाव शिवसेनेने ‘माझे रेशन, माझा अधिकार’ मंचची स्थापना केली आहे, अशी माहिती उत्तर नगर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली आहे.
कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे अनेकांची उपासमार होत आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्याची आर्थिक सहाय्य तर केंद्राची गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना एप्रिल व मे महिन्यात पैकी एक महिन्याचे प्रति सदस्य 3 किलो गहू, दोन किलो तांदूळ आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 35 किलो धान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे. तसेच या योजनेतील मे महिन्याकरीता अनुज्ञेय असलेले नियमित अन्नधान्य प्रति सदस्य प्रतिमहा पाच किलो व त्याचप्रकारे जूनमध्ये मोफत वितरण करण्यात येणार आहे. परंतु, याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेने ‘माझे रेशन, माझा अधिकार’ मंचची स्थापना केली आहे. उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कलविंदरसिंग दडीयाल, भरत मोरे, अस्लम शेख, इरफान शेख, गगन हाडा, प्रफुल्ल शिंगाडे, बाळासाहेब साळुंखे, अमजद शेख, विकास शर्मा यांची शहर तर शिवाजी ठाकरे, रावसाहेब थोरात, श्रीरंग चांदगुडे, बाळासाहेब मापारी, बाळासाहेब राऊत, सचिन आसने, महेश कुलकर्णी, पंकज शिंदे यांची तालुका समिती जाहरी केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास काही अडचणी येत असेल तर संबंधितांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत