राहुरी : गोविंद फुणगे सध्या राहुरीचे राजकारण ' त्या' पाच नवीन' रुग्णवाहिके'मुळे काहीसे अस्वस्थ बनले आ...
राहुरी : गोविंद फुणगे
सध्या राहुरीचे राजकारण ' त्या' पाच नवीन' रुग्णवाहिके'मुळे काहीसे अस्वस्थ बनले आहे. त्यात राहुरीकरांचे भूषण असलेल्या दोन दादांमध्ये देखील बिबा घालण्याचे काम काही राजकीय हस्तकांनी सुरू केले आहे, विखे- तनपुरे यांचं कधी बिनसेल तसेच तनपुरे- पाटील यांच्यामध्ये आणखी कसं पेटेल व त्याचा फायदा अप्रत्यक्ष आपल्याला कसा होईल ? यासाठी अगदी सोयीस्करपणे काही लोकं कामाला लागले आहेत. या सर्व षड्यंत्रात्तूनच सध्याच्या संकटात जनतेला वेठीस धरून नेत्या नेत्यांत भांडणे लावून राहुरीचे राजकारण गढूळ केले जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.सध्याच्या कोरोना संकटात सर्व पक्षाचे नेते जनतेसाठी एकदिलाने मदतकार्य करत असताना राहुरीतही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार डॉ सुजय विखे पाटील, तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील यांनी आपली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. कोव्हिडं सेंटर, रेमडीसीवर, लसीकरणं यात खा. विखे व मंत्री तनपुरे यांनी केलेले नियोजन तर राज्यासाठी मॉडेल ठरले आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत पक्ष वेगळे असले तरी या दोन दादांनी कधीही राजकारण केले नाही, केवळ जनता डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अहोरात्र मदतीची भावना ठेवून यंत्रणा राबवली. त्यामुळे राहुरीत खरोखरचं राजकीय शांतता नांदत होती, येथील जनता या दोन दादांमुळे कोरोनातही बिनधास्त होती, मात्र, तालुक्यात पाच नवीन रुग्णवाहिका आल्या आणि काही संधी साधूंनी याचे राजकीय भांडवल सुरू केले. आता जि. प सदस्य शशिकला पाटील व तालुक्याचे जेष्ठ नेते सुभाष पाटील यांनी नव्या रुग्णवाहीकेचे लोकार्पण केले आणि काहीच्या पोटात गोळा उठला. पुढे याला राजकीय रंग चढवला गेला. आता पाटील घराण्याला लोकार्पण काही नवं नाही, ते तब्बल 25-30 वर्ष झेडपीत सदस्य होते, त्यामुळे त्यांनी हौस म्हणून हे लोकार्पण केले नव्हते तर त्यांच्या गटात उंबरे ग्रामीण रुग्णालय असल्याने त्यांचा तो अधिकार होता, त्यांचा पाठपुरावा होता म्हणून त्यांनी ते लोकार्पण केले, मात्र काही लोकांना पाटील व तनपुरे घराणे कोणत्याही परिस्थितीत जवळ येऊ नये, असे वाटत असल्याने मंत्री प्राजक्त तनपुरेंचें कान भरले किंवा लक्ष वेधले किंवा डिवचले म्हणू. त्यांनतर तनपुरे यांनी रुग्णवाहिका लोकार्पण करून घेतलं, त्यात तनपुरे पाटलांबद्दल असे बोलले, तनपुरे तसे बोलले, अशा वावड्या उठवल्या गेल्या. काहींनी हे प्रकरण इतभर होत ते हातभर वाढवलं, मात्र चाणाक्ष तनपुरे याना पाटील घराण्याविषयी आदर असल्याने त्यांनी आपल्या भाषणात उलट पाटील कुटुंबियाने रुग्णवाहिकेचे लोकार्पण केल्याचा मला आनंद आहे, असे सांगून या वादावर पडदा टाकत पाटील-तनपुरेंचे नासवणाऱ्यांना चपराक दिली, मात्र आता पहिला डाव हुकल्याने आता तनपुरे- विखे संबंध तरी किमान कसे बिघडतील, याकडे काही लोक काम करू लागली, झालं ही तसच खा सुजय विखे हे मंत्री तनपुरेवर नाव न घेता थोडं बोलले आणि पुन्हा इतभरच हातभर झालं, त्यावर तनपुरेही भडकले आणि त्यांनी टीकेला उत्तर दिलं, आता तनपुरेंनी उत्तर दिल्यानंतर विखे समर्थकानाही प्रश्न पडला की अस विखे काही बोललेच नव्हते तर तनपुरे यावर उत्तर कसे देऊ शकतात, खुद्द विखे गटाच्या एका कार्यकर्त्याने विखे-तनपुरे संबंध बिघडतील कसे यासाठी काही लोक एकमेकांविषयी गैरसमज पेरवीत आहेत,अशी कबुली दिली आहे. याशिवाय कर्डीले-विखे यांच्यामध्येही याच काही लोकांनी दुरावा आणला होता, इकडचं ऐकायचं आणि तिकडे जाऊन सांगायचं हा प्रकार सध्या ,जोरात सुरू आहे. त्यामुळे तनपुरे कुटुंबाचे विखे आणि पाटील घराण्याशी संबंध कसे बिघडतील, त्यातून आपला स्वार्थ कसा साधता येईल, हा डाव काहींचा आहे. मात्र, पक्षीय राजकारण वेगळे मात्र त्यात अंतर्गत संबंध तोडण्यात, या महाभागांना फारसे यश येईल असे सध्यातरी वाटत नाही. परंतु, विखे, तनपुरे, पाटील हे नक्कीच या प्रकरणाच्या तळाशी जाऊन अशा लोकांना चार हात दूर ठेवतील, अशी जनतेची अपेक्षा आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत