राहुरी /गोविंद फुणगे राहुरी तालुक्यातील मानोरी आरोग्य केंद्रातचा कारभार म्हणजे आंधळ दळतंय अन् कुञ पिठ खातय अशी झाली आहे.येथील आ...
राहुरी /गोविंद फुणगे
राहुरी तालुक्यातील मानोरी आरोग्य केंद्रातचा कारभार म्हणजे आंधळ दळतंय अन् कुञ पिठ खातय अशी झाली आहे.येथील आडमुठ्या आरोग्य सेवकाच्या वर्तनाने अनेक नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.कोविड चाचणी करण्यासाठी आलेल्या नागरीकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळकाढुपणा करणारे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने या उर्मट सेवकाच्या पृष्ठ भागावर लाथ मारून त्याची उचलबांगडी करावी अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे.त्यामुळे आरोग्य विभागाच्या वरीष्ठ अधिका-यांनी हे आरोग्य केंद्रच तपासाची करण्याची गरज आहे.
गेल्या काही काळापासून जगावर कोविड चे संकट कोसळले आहे.या महामारीविरोधात लढण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच विविध विभाग देखील शर्तीचे प्रयत्न करत आहे.अनेक ठिकाणी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी जीव धोक्यात घालुन चांगली कामगिरी करत आहेत.परंतू काही अपवादात्मक महाभागाच्या कारणामुळे आरोग्य विभाग बदनाम होत आहे.असाच काहीसा प्रकार मानोरी (ता.राहुरी) येथील आरोग्य विभागातील काही कर्मचा-यांमुळे घडत आहेत.शासणाने कोविड चाचण्याचे उदिष्ट आरोग्य केंद्राला दिले आहे.त्यामुळे मानोरीत या चाचणीसाठी नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.माञ एकाच वेळी सर्व व्यक्ती आल्यावरच चाचची केली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन नागरीकांना ताटकळत बसावे लागत आहेत.येथे कायम स्वरूपी आरोग्य अधिकारी उपलब्ध असावेत असा बंधनकारक नियम असताना देखील येथे पुर्ण वेळ आरोग्य अधिकारी उपलब्ध नसतात.तसेच कर्मचा-यांवरही त्यांचा अंकुश नसल्याने असे प्रकार सातत्याने घडत आहेत.त्यामुळे वरीष्ठ अधिका-यांनी याबाबद तात्काळ लक्ष घालुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
मी मानोरी येथील आरोग्य केंद्रात कोविड रॅपीड चाचचीसाठी सकाळी १० वाजता गेलो असता तेथे कमीत कमी २० व्यक्ती एकाच वेळी आल्यावर चाचणी सुरू केली जाईल असे येथील आरोग्य सेवक एस.ए.पौंदे यांनी सांगितले.दोन तास उलटल्यानंतर मला ञास होऊ लागल्याने आमची चाचची करूण द्या विनंती केल्यानंतर तुम्हाला वेळ नसला तर वळणला,आरडगाव ला किंवा खाजगीत जा असा सल्ला दिला.त्यानंतर सदर हकीगत मांजरी येथील आरोग्य अधिकारी मल्हारी कौतुके यांना भ्रमनध्वनीवरून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ चाचची करण्याचे आदेश दिले.त्यानंतर तर चक्क पिपीकिटच नाही असे उत्तर देऊन या सेवकाने अकलेचे तारे तोडले.त्यानंतर मी येथुन निघुन गेल्यानंतर पुन्हा आरोग्य अधिकारी कौतुके यांनी भ्रमनध्वनीवरून संपर्क साधुन मला चाचणी करण्याची विनंती केल्यानंतर १२:३० वा.चाचणी करून घेतली.त्यामुळे येथील आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीने मोठा मनस्ताप झाला.या उर्मट कर्मचा-यावर योग्य ती कारवाई करावी ;अविनाश आढाव
मानोरी आरोग्य केंद्रात महिला अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवक हे आरोग्य केंद्रात कामयच गप्पा मारण्यात मग्न असतात.तेथे गेलेल्या रूग्णाकडे देखील ते अनेक वेळा दुर्लक्ष करून गप्पातच मग्न होतात त्यामुळे अनेकांना येथील आरोग्य व्यवस्थेचा वाईट अनुभव येत आहे त्यामुळे वरीष्ठांनी याबाबद लक्ष घालावे;बाळासाहेब पोटे
मानोरी येथील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना नागरीकांना सेवा देने क्रमप्राप्त आहेत.परंतु हे अनेक वेळा वेळेवर हजर नसतात.त्यामुळे अनेकांना ञास सहण करावा लागते याकडे वरीष्ठांनी लक्ष घालावे;भाऊसाहेब आढाव


कोणत्याही टिप्पण्या नाहीत