राहुरी/बेबटिम:- केंद्र सरकारने आरटीओ कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अधिकृत चालक मालक प्रतिनिधी यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळण्याच्...
राहुरी/बेबटिम:-
केंद्र सरकारने आरटीओ कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अधिकृत चालक मालक प्रतिनिधी यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळण्याच्या नैराश्यातुन राहुरी फॅक्टरी गुलाब राघोजी मोडवे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय.त्यामुळे या निर्णयाचा शासनाने फेरविचार करून सदर अधिकृत प्रतिनिधींचा या कामात समावेश करून घ्यावा अध्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य चालक मालक प्रतिनिधी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल थोरात यांनी दिला आला आहे.
राहुरी फॅक्टरी येथील चालक मालक प्रतिनिधी गुलाब मोढवे यांनी मुळा धरणाच्या पाण्यात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.केंद्र सरकारने अचानक देशभर आर.टि.ओ.कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्यानेच हि घटना घडली असल्याचे सदर संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे मोढवे कुटूंबियांचे भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात येऊन शासनाने मदत करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.आर टि ओ कार्यालये बंद करण्याच्या निर्णयानेच महाराष्ट्रातील हि पहिली आत्महत्या झाली असुन देशभरात लाखों प्रतिनिधीं बेरोजगार होणार होतील अन् यातूनच आत्महत्या चे सञ सुरू होईल अशी भीती ही व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे आगामी काळात परिवहन मंञी तसेच राज्यपाल यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य चालक मालक प्रतिनिधी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल थोरात,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप गाडेकर यांनी दिली आहे.मराठवाडा उपाध्यक्ष यजाज काझी यांनी दिली आहे. याप्रसंगी योगेश निकम,विकी गव्हाणे,दीपक कचेरीया, शकील पटेल, अल्ताफ पठाण,नागेश देवांगे,किरण होन, योगेश मेढे, पंकज अग्रवाल आदिंसह जिल्हातील पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत