राहुरी (बेबटिम):- नगर तालुक्यातील डोंगरगण येथे नगरविकास उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्...
राहुरी (बेबटिम):-
नगर तालुक्यातील डोंगरगण येथे नगरविकास उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले . तसेच शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकरी बांधवांना बियाणे आणि निविष्ठा वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांना नवीन कृषी ऊर्जा धोरणानुसार मार्गदर्शन करून या धोरणाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कोरोना कालखंडात आपण सर्वांनी अवघड दिवस पाहिले आहेत. आता जीवन गाडी रुळावर येत असली तरी यापुढेही सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करत आरोग्याची काळजी घ्यावी असे अवाहनही नामदार तनपुरे यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, रघुनाथ झिने, सरपंच वैशालीताई मते, उपसरपंच संतोष पटारे, अशोक मते, बबन अण्णा पटारे, दानिल नाना शिरसाठ, गमाजी मते, अशोक चांदणे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, महावितरण अधिकारी, कृषी अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत