कोपरगाव/प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द झ...
कोपरगाव/प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. याच्या निषेधार्थ भाजपने (वसंत स्मृती) आज राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार कोपरगावातही भाजपच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे इतर मागासवर्गींयाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे या वर्गातील घटकांवर अन्याय झाला आहे. इतर मागासवर्गींयासह मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावे, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.
महाविकास आघाडी सरकार केवळ मतांपुरतेच ओबीसी वर्गातील समाजाला जवळ धरत असल्याचा आरोप करुन त्यांच्या हिताचे कुठलेही निर्णय घेतले नसल्याचा घणाघात केला. याचा निषेध करुन तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात विनायक गायकवाड, विनीत वाडेकर, विजय वहाडणे, चेतन खुबाणी, योगेश वाणी, किरण वडनेरे, मनोहर कृष्णाणी, संजय कांबळे, बागरेचा, प्रमोद पाटील, वसंत जाधव, राजेंद्र खैरे, विजय बडजाते, नंदकुमार जोशी, विजय भोईर, सादिक शेख, धनराज परदेशी, संजय कानडे, सुभाष दवंगे, नामदेव जाधव, वाल्मिक भोकरे आदिंसह सहभागी झाले होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत