राहुरी(वेबटीम) "सुंदर माझे कार्यालय" या अभियानाअंतर्गत जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या सुचनेनुसार राहुरी पोलिस ठाण्यातील...
राहुरी(वेबटीम)
"सुंदर माझे कार्यालय" या अभियानाअंतर्गत जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या सुचनेनुसार राहुरी पोलिस ठाण्यातील परिसरात पोलिसांनी स्वतः स्वच्छता मोहीम राबवत एक अगळा-वेगळा उपक्रम राबविला आहे.शनिवारी सकाळीच पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी स्वतः हातात झाडू घेत आपल्या आवारातील परिसर स्वच्छ केला आहे.त्यांचे बरोबर पोलिस ठाण्यातील सर्वच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील परीसरातील केर-कचरा उचलून परीसर स्वछ करण्यात आपला सहभाग नोंदवला आहे.
सदर मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, तुषार धाकराव,पो.हवालदार नारायण ढाकणे,संतोष राठोड,निलेश मेटकर,महिला पो.ना.राधिका कोहकळे,अजिनात पाखरे, सचिन ताजने,शामद शेख,बाळासाहेब चाबुकस्वार,रोहित पालवे,लक्ष्मण बोडखे,सरीता गायवाड ,अमित राठोड,पो.ना.साळवे वैभव आदि पोलिसांनी सहभाग नोंदविला.
राहुरी तहसील आणि पोलिस ठाणे आवारामध्ये कुठल्याही व्यक्तीने पान तंबाखू आणि गुटखा खाऊन थुंकून परीसरात अस्वच्छता करू नये. परिसर स्वच्छता ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.अस्वच्छता करताना कोणी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल; पो.नि. नंदकुमार दुधाळ



कोणत्याही टिप्पण्या नाहीत