राहुरी : वेबटीम। मुळा नदीवरील लघु पाटबंधारे तलाव पिंपळगाव खांड दि.२५/६/२०२१ रोजी रात्री ९:०० वा पूर्ण क्षमतेने भरले आहे. सदर प्रकल्पाचा पा...
राहुरी : वेबटीम।
मुळा नदीवरील लघु पाटबंधारे तलाव पिंपळगाव खांड दि.२५/६/२०२१ रोजी रात्री ९:०० वा पूर्ण क्षमतेने भरले आहे. सदर प्रकल्पाचा पाणीसाठा ६००.०० दलघफू आहे.ओव्हरफ्लो विसर्ग साधारणत: १५०-२०० क्युसेक्स आहे. दरम्यान, मुळा धरणाच्या दिशेने 200 ने पाण्याची आवक सुरू झाली आहे. या हंगामात पावसाने दडी मारल्याने सर्वांच्या नजरा धरणातील पाण्याकडे लागल्या होत्या. मात्र, दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने मुळा नदी वेगात वाहू लागली आहे. परिणामी, पिंपळगाव खांड धरण भरले असून, खाली मुळा धरणाच्या दिशेने 200 क्यूसेक्सने पाणी झेपावले आहे. लवकरच हे पाणी मुळा धरणात दाखल होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत