पञकारांनी चांगल्या कार्याला प्रोत्साहन द्यावे;पो.नि.दुधाळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पञकारांनी चांगल्या कार्याला प्रोत्साहन द्यावे;पो.नि.दुधाळ

राहुरी/प्रतिनिधी    समाजात चाललेल्या चांगल्या आणि वाईट कामाचे वास्तव आपल्या लेखनातून समाजासमोर मांडण्याचे काम पञकार करत असतात.समाजाचा एक महत...

राहुरी/प्रतिनिधी 

 समाजात चाललेल्या चांगल्या आणि वाईट कामाचे वास्तव आपल्या लेखनातून समाजासमोर मांडण्याचे काम पञकार करत असतात.समाजाचा एक महत्त्वाचा घटक पञकार असतो म्हणून पञकार बांधवांनी चांगल्या कामांना प्राधान्याने प्रोत्साहन दिले पाहिजे असे गौरवोद्गार पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी काढले.

      महाराष्ट्र ग्रामीण पञकार संघाची राहुरी कार्यकारिणीच्या नूतन पदाधिका-यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी दुधाळ बोलत होते. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेची राहुरी तालुका कार्यकारणीची निवडी झाल्याबद्दल नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा राहुरी पोलिस ठाण्याच्या वतीने कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ साहेब यांनी सत्कार करूण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यायाप्रसंगी जिल्हा मार्गदर्शक विलास कुलकर्णी, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे,तालुका अध्यक्ष गोविंद फुणगे, उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे,शहराध्यक्ष शरद पाचारने,सचिव आकाश येवले आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत