राजर्षी शाहु महाराज जयंती व स्व.जिजाबा पाटील(बाबा)यांची पुण्यतिथी साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राजर्षी शाहु महाराज जयंती व स्व.जिजाबा पाटील(बाबा)यांची पुण्यतिथी साजरी

राहुरी(वेबटीम)  श्री.गाडगे महाराज आश्रमशाळेत लोकराजा राजर्षी, जनता जनार्दनांना सामाजिक समतेचा संदेश स्वतःच्या कृतीतून देणारे,आपल्या राज्यात ...

राहुरी(वेबटीम)

 श्री.गाडगे महाराज आश्रमशाळेत लोकराजा राजर्षी, जनता जनार्दनांना सामाजिक समतेचा संदेश स्वतःच्या कृतीतून देणारे,आपल्या राज्यात सर्वांना प्रगतीची समान संधी मिळावी म्हणून आपल्या अधिकारांचा सदुपयोग करुन "आरक्षणाचे जनकत्व" पत्करणारे छत्रपती शाहु महाराज यांची जयंती "सामाजिक न्याय दिन"म्हणुन साजरी करण्यांत आली तसेच संत श्री.गाडगे महाराज यांचे अनुयायी,क्रांतीसिंह नाना पाटील यांचे सहकारी,श्री.गाडगे महाराज मिशन परीवाराचे सेवाव्रती,थोर स्वातंत्र्य सैनिक स्व.जिजाबा पाटील सोहोलीकर(बाबा)यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यांत आले.                         

   याप्रसंगी प्राथ. मुख्याध्यापक श्री.गजानन खर्चे व माध्य.मुख्याध्यापक  श्री.जगन्नाथ सूर्यवंशी,श्री.अविनाश इंगळे,श्री.अंबादास उंडे,श्री.किरण पवार,अधिक्षक श्री.अजाबराव गोळे,अधिक्षिका श्रीमती आरती लाड,श्रीमती अंजनाबाई मोरे,श्री.संजय सूर्यवंशी,श्री.नामदेव कोल्हे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत