राहुरी येथे “छत्रपतींच्या” परिसरात छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी येथे “छत्रपतींच्या” परिसरात छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न

राहुरी (प्रतिनिधी) रविवार ६ जून रोजी छत्रपती चौक राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. गेल्या ...

राहुरी (प्रतिनिधी)

रविवार ६ जून रोजी छत्रपती चौक राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोंना रोगाच्या प्रादुर्भावमुळे महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील नागरिक संकटात सापडलेले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखिल संकटांवर मात करत रयतेच्या मनातील स्वराज्य स्थापन केले.याचीच प्रेरणा घेऊन कोरोंना सारख्या आजाराविरुद्ध लढण्याची जिद्द स्वराज्यातील प्रजेला मिळावी या हेतूनं राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानंतर अखंड स्वराज्याचे पहिले राजे झाले.हा आनंदाचा क्षण अजरामर झाला.या उत्सवाचे महत्व येणार्‍या पिढीला कळावे या उद्देशाने ज्या परिसराला “छत्रपतींच्या” नावाने ओळखले जाते अशा “छत्रपती चौक” या ठिकाणी मराठा बहूऊद्देशीय संस्था संचालित मराठा एकीकरण,शिवराज्याभिषेक सोहळा कमिटी राहुरी तालुका यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील यांनी संगितले.

यावेळी सकाळी शाश्रयुक्त पाठणात जिजाऊंच्या लेकी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंच धातूच्या मूर्तीस पंचामृताचा अभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले.स्वराज्याचे निशाण भगवा ध्वज उभारून वंदन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी कोरोंना रोगाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता एका वेळी गर्दी होऊ नये म्हणून शिवप्रेमींना सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती.शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राजक्ता वाघ,शेजल ढेपे,वैष्णवी देहडराय,प्रतिभा घाडगे,विद्या अरगडे, जाणका लबडे,वर्षा लांबे,राजश्री घाडगे आदी उपस्थित होत्या.प्राजक्ता वाघ यांनी सिहं गर्जना म्हंटली.  


कोरोंना रागाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षित अंतर ठेऊन येणार्‍या प्रत्येक नागरिकास सेनिटाझर वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.


यावेळी शिवराज्याभिषेक सोहळासमितीचे अध्यक्ष अमोल पवार पा. म्हणाले की “छत्रपती चौक” राहुरी येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.कोरोंना रोगाच्या प्रादुर्भावमुळे व प्रथम वर्ष असल्यामुळे साध्य पद्धतीने सोहळा साजरा करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी ६ जून २०२२ चा सोहळा निश्चित मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे.२०२२ च्या सोहळ्याचे नियोजन यावर्षीच केले जाईल. भविष्यकाळात “छत्रपती चौक” येथील सोहळा रायगड नंतर महाराष्ट्रात प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारे साजरा केला जाईल असे पवार पाटील म्हणाले.


या सोहळ्यास उपाध्यक्ष राजेंद्र लबडे,संदीप गाडे,अशोक तुपे,शरद म्हसे,संदीप गिते,डॉ.महेश गव्हाने,ॲड.अमोल डौले,मधुकर घाडगे,प्रकाश अरगडे,आबासाहेब शेटे,रणजीत चव्हाण,राहुल अडसूरे,अविनाश क्षीरसागर,विक्रम मोढे,दिनेश झावरे,निखिल भुजाडी,सतिष घुले,योगेश कोहकडे,निखिल कोहकडे,अरुण निमसे,विनोद सरोदे,पंडित निभोरे,ज्ञानेश्वर टेकाळे,प्रशांत टेकाळे,विक्रम गाढे,गजानन गागरे,विनायक बाठे,सागर ताकटे,सचिन मेहेत्रे,संजय पोपळघट,शिवाजी खणसे,रविंद्र तनपुरे,कुलदीप नवले,संभाजी खणसे,संदीप खाडवे,भुजाडी,नितिन पानसरे,विनोद सरोदे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत