आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील आंबी, अंमळनेर, दवणगाव, केसापूर, संक्रापूर, गंगापूर येथे ६ जून हा दिवस बहुजन प्रतिपालक छत...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील आंबी, अंमळनेर, दवणगाव, केसापूर, संक्रापूर, गंगापूर येथे ६ जून हा दिवस बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक दिन स्वराज्य दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी आंबी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोरील परिसर स्वच्छ करून भगव्या पताक्यासह गुढी उभारून सरपंच संगीताताई बाळासाहेब साळुंके व उपसरपंच विजय डुकरे यांच्या हस्ते पूजअभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच बापू साळुंके, सुनिल लोंढे, ग्रामपंचायत सदस्य संदीप साळुंके, रावसाहेब फुलमाळी, सुभाष डुकरे, पत्रकार विश्वनाथ जाधव, बाळासाहेब साळुंके, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे, ज्ञानदेव सालबंदे, दत्तात्रय हुरुळे, गणेश रोडे, सोमनाथ साळुंके, गणेश कोळसे, आंबी सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन केशव साळुंके तसेच अंमळनेर ग्रामपंचायतमध्ये सरपंच अरुणाताई भारत जाधव, उपसरपंच किरणतात्या कोळसे, ग्रामपंचायत सदस्य दादा साळुंके,डॉ. संदिप जाधव, अरुण काळे, शिवाजी जाधव, शरद साळुंके, ग्रामसेवक अभिजित पिंपळे, सिस्टर अमृत, अंगणवाडी सेविका कल्पना साळुंके, मंगल रोडे, श्रीहरी साळुंके, चंद्रकला चव्हाण, प्रशांत चव्हाण उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत