सात्रळ/वेबटीम:- शिवरायांनी महाराष्ट्राला, मराठी माणसाला स्वाभिमान शिकवला. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वप...
सात्रळ/वेबटीम:-
शिवरायांनी महाराष्ट्राला, मराठी माणसाला स्वाभिमान शिकवला. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. महाराजांनी मोगल, आदिलशाही अशा जुलमी राजवटीला उलथवून टाकून नव स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अविरत संघर्ष केला. आजच्या युवकांनी महाराजांची ही ध्येयनिष्ठा डोळ्यासमोर ठेवून आपली यशोगाथा घडवणे गरजेचे असल्याचे मत प्रतिपादन सात्रळ महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो.डॉ. सोमनाथ घोलप यांनी केले.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथे उत्सव समिती आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक दिन "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या स्पर्धेत कु. मनीषा अशोक पवार हीने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक कु. पुनम लक्ष्मण गागरे तर तृतीय क्रमांक कु. माधुरी अशोक पवार यांनी प्राप्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डाॅ. सोमनाथ घोलप होते.
प्रास्ताविक डॉ. भाऊसाहेब नवले यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, कार्यालयीन अधिक्षक श्री. विलास शिंदे, प्रा. विनोद पलघडमल यांनी महाविद्यालयात उपस्थित राहून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.दीपक घोलप यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ऑनलाईन शिवस्वराज्य दिना समारंभास विद्यार्थी - विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत