अंमळनेर ग्रामपंचायत मार्फत विविध लाभांचे वितरण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अंमळनेर ग्रामपंचायत मार्फत विविध लाभांचे वितरण

  आंबी (वेबटीम) राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अंमळनेर ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर...

 आंबी (वेबटीम)

राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अंमळनेर ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक विकास निधी, अपंग कल्याण निधी या योजनांच्या लाभांचे गावातील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

        अंमळनेरच्या विद्यमान सरपंच अरुणाताई भारत जाधव, उपसरपंच किरण कोळसे यांच्याहस्ते विद्यार्थिनींना सायकल व दिव्यांग बांधवांना गृहपयोगी वस्तू खरेदीसाठी निधीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई कोंडीराम साळुंके, उज्वला दादासाहेब साळुंके, नंदकुमार जाधव, डॉ. संदिप जाधव, ग्रामसेवक अभिजित पिंपळे, कोंडीराम साळुंके, भारत जाधव, बाळासाहेब साळुंके, दादासाहेब साळुंके, भाऊसाहेब तेलोरे, सखाराम पाळंदे, संजय पाळंदे, दिपक पाळंदे, सुल्याबाई पाळंदे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकला चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली.

"जेष्ठ नेते राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंतराव कोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विविध प्रकारचे विकास कामे प्रस्तावित आहेत. ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवू. गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत."

- अरुणाताई जाधव (सरपंच अंमळनेर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत