राहुरी /बेबटिम:- राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मनिषा र...
राहुरी /बेबटिम:-
राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मनिषा रणजीत आढाव याची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात मानोरी लोकनियुक्त सरपंच अब्बास शेख यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. मनिषा आढाव यांच्या नावाची सुचना दिलावर पठाण यांनी मांडली त्यास शिवाजी थोरात यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले. उपसरपंच बांपुसाहेब देवकाते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर मनिषा आढाव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड यांनी जाहीर केली.
याप्रसंगी सदस्य हिराबाई ठुबे ,दिलावर पठाण, प्रियंका जाधव, शिवाजी थोरात, कल्पना आढाव, बापूसाहेब देवकाते, आण्णासाहेब तोडमल, शकुंतला चोथे, छाया पिलें, मनोज आढाव, शकुंतला आढाव, शामराव आढाव , डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव, माजी संचालक निवॄत्ती आढाव, शिक्षक बॅकेचे मा. अध्यक्ष उत्तमराव खुळे ,माजी.उपसभापती रवींद्र आढाव, बांपुसाहेब वाघ, पत्रकार रणजीत आढाव,भाऊसाहेब आढाव, संपत थोरात,पोपट जाधव,गोरक्षनाथ गुऺड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नुतन उपसरपंच मनिषा आढाव व मावळते उपसरपंच बापूसाहेब देवकाते यांचा सत्कार करण्यात केला.नवनियुक्त उपसरपंच आढाव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आढाव म्हणाल्या की, कोणत्याही गटातटाचा विचार न करता सर्वांच्या सहकार्याने गावच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न केला जाईल .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत