कोपरगाव/प्रतिनिधी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी उत्कृष्ट कामकाज केल्याने त्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कोपरगाव ...
कोपरगाव/प्रतिनिधी
कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी उत्कृष्ट कामकाज केल्याने त्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत सोमवारी (ता.14) आमदार आशुतोष काळे व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, अद्यापही कोविडचे संकट टळलेले नाहीये. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी कोविडमध्ये योग्यवेळी धाडसी निर्णय घेऊन परिस्थिती व्यवस्थितरित्या हाताळली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव कोरोना आकडेवारीमध्ये जिल्ह्यामध्ये दुसर्या-तिसर्या क्रमांकावर होते. शिवाय प्राणवायू आणि रेमडेसिविरचा तुटवडा भासत होता. अशा परिस्थितीत प्राणवायूबाबत तत्काळ निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावला. अन्यथा कोपरगावात कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले असते.
परंतु, प्रशासनाशी समन्वय ठेवत मुख्याधिकारी सरोदे यांनी वेळीच निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. अद्यापही संकट टळले नसल्याने जर त्यांची बदली केली तर नूतन अधिकार्यांना परिस्थिती हाताळणे कठीण होईल. या पार्श्वभूमीवर सरोदे यांना मुदतवाढ द्यावी. या संदर्भात यापूर्वीही मनसेने पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, त्याची दखल घेतली गेलेली नाही. आता तरी याची दखल घ्यावी. अन्यथा 16 जून रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करु असा इशारा मनसेने दिला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड आणि दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या सह्या आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत