वृक्षरोपणाने व संविधान उद्देशिकेच्या वाटपाने पर्यावरण दिन साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वृक्षरोपणाने व संविधान उद्देशिकेच्या वाटपाने पर्यावरण दिन साजरा

राहूरी(वेबटीम)  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन राहुरीतील बोधिसत्व डांँ बाबसाहेब आंबेडकर स्मारक समिती व डांँ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व ...

राहूरी(वेबटीम)

 जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन राहुरीतील बोधिसत्व डांँ बाबसाहेब आंबेडकर स्मारक समिती व डांँ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी)पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्मारक समितीच्या प्रांगणात विविध वृक्षाचे रोपण करून मान्यवरांच्या हस्ते ५ जुन हा  "जागतिक पर्यावरण दिन"साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरूवात बार्टीचे राहुरी समतादुत ईजाज पिरजादे यांनी बार्टी च्या विविध उपक्रमाची माहीती देऊन आजच्या दिवसाचे महत्व विशद केले.तर स्मारक समितीचे मंगेश पगारे यांनी स्मारक समितीच्या गेल्या १७ वर्षापासुन चालवत असलेल्या व्याक्यानमाला ,महिला सक्षमीकरण,प्रबोधनाचा जागर इ.विविध उपक्रमाचा आढाव घेऊन "वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे"हे जगतगुरू संत तुकारायाच्या वाक्याने वृक्षाचे महत्त्व सांगितले.या वेळी समितीचे आजीव सदस्य व अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राहुरी अध्यक्ष अरूणजी तुपविहिरे यांनी समितीची वेबसाईड निर्माण करण्याची व संपुर्ण त्याची जबाबदारी उचलण्याची घोषणा केली.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे राहुरी आय टी आय काँलेजचे मा.प्राचार्य चंद्रकांतची भोसले,ग्रामपंचायत सदस्य मनोज घोकशे,अंबादास साखरे,पोपट पटारे,तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे,तसेच समितीचे आधारस्तंभ व मा.सरपंच मधुकरराव साळवे,डांँ प्रविणजी क्षीरसागर,उत्तमराव सातपुते ,विनितकुमार कांबळे,प्रशांत सातपुते तसेच प्रविण दाभाडे,संतोष जोगदंड,तेजराव वाघ,बाळासाहेब ताटे,विशाल कुसरे,आनंद दाभाडे,अक्षय जगताप इ.हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.तसेच या वेळी समतादूत ईजाज पिरजादे यांनी बार्टीच्या  संविधान उद्देशिकेच्या प्रतींचे वाटप केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्व सदस्य,बार्टीचे समतादूत,राहुरी खुर्द ग्रामपंचायत व ग्रामस्त इ.प्रयत्न केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत