कोपरगाव/प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्...
कोपरगाव/प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यात १० हजार वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी (ता.५) शहरातील प्रभाग दोनमधील सुभद्रानगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित 'माझा प्रभाग, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत सुभद्रानगर, जानकी विश्व, रिध्दी सिध्दी परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, अनिरुध्द काळे, राजेंद्र बोरावके, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कार्तिक सरदार, योगेश वाणी, आशुतोष देशमुख, राहुल हलवाल, रुपेश वाघचौरे, सोमनाथ आढाव, अण्णा लोखंडे, कुंदन भारंबे, संदीप सावतडकर, अण्णासाहेब बोरावके, बापूसाहेब इनामके, तुळशीराम आढाव, अंकुश लासनकर आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत