सात्रळ/वेबटीम:- सात्रळ आरोग्य उपकेंद्र मार्फत नागरिकांना कोरोना च्या लसीकरण च्या दुसऱ्या डोस देण्याच्या वेळी सावळा गोंधळ झाल्यामुळे ...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ आरोग्य उपकेंद्र मार्फत नागरिकांना कोरोना च्या लसीकरण च्या दुसऱ्या डोस देण्याच्या वेळी सावळा गोंधळ झाल्यामुळे नागरिकांना कारण नसताना मनस्ताप सहन करावा लागला आहे. लसिकरणाच्या आदल्या दिवशी आरोग्य उपकेंद्र मार्फत दुसऱ्या दिवशी मार्च अखेर पहिल्या डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याचे कळिवले होते, प्रत्यक्षात लसिकरणाच्या वेळे मार्च महिन्याच्या शेवटी पाहिला डोस घेतलेल्याना दुसरा डोस नाकारण्यात आल्यामुळे नागरीकरण हेलपाटा मारावा लागून मनस्ताप सहन करावा लागल्याने ग्रामस्थ कडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरनाच्या ठिकाणी नियोजनाच्या अभाव, आरोग्य कर्मचारीची अरे रावी, वरिष्ठ आरोग्य अधिकारी नागरिकांच्या प्रश्न सोडविण्यास असमर्थता अश्या अनेक अडचणींना ग्रामस्तांना तोंड द्यावे लागत आहे. एकतर गावांच्या लोकसंख्या च्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात लस उपलब्धता, त्यात लसीकरण कार्यक्रमात नियोजन शून्यता यामुळे आरोग्य विभाग कामकाजा चे चर्चा सर्वत्र होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत