नेवासा(वेबटीम) चर्च ऑफ जीजस क्राईस्टचे बिशप रेव्ह.सुर्या गजभिव व त्यांची पत्नी सौ मनीषा गजभिवं यांनी 350 गरजू कुटुंबाना किराणा मालाचे वाटप क...
नेवासा(वेबटीम)
चर्च ऑफ जीजस क्राईस्टचे बिशप रेव्ह.सुर्या गजभिव व त्यांची पत्नी सौ मनीषा गजभिवं यांनी 350 गरजू कुटुंबाना किराणा मालाचे वाटप केले.
महाराष्ट्रासह संपूर्ण जगात कोरोना या रोगाने हाहाकार माज वला आहे.त्यामुळे मोलमजुरी करून पैसा कमवणाऱ्या तसेच काम केले तरच संध्याकाळी चूल पेटणाऱ्या गरीब कुटुंबावर संकट कोसळले या लोकडाऊनच्या काळात कित्येक घरातील चुली पेटल्याच नाही याचा सर्वांगीण विचार करून चर्च ऑफ जीजस क्राईस्टचे बिशप सूर्या गजभिव व त्यांच्या पत्नी सौ मनीषा गजभिव यांनी 350 गरीब कुटुंबांना किराणा वाटप केले मागील वर्षी देखील कोरोना काळात 600 कुटुंबाना किराणा वाटप करून आधार दिला होता.
यासाठी त्यांना त्यांची मुले जॉय व जय तसेच दीपक बनसोडे, निखिल केंदाळे,आतिष धोत्रे,बाळासाहेब धोत्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.गजभिव परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत