राहुरी/बेबटिम:- राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू विक्री अड्यावर पोलिसांनी छापा टाकात २५०० रूपयांचा दारूच्य...
राहुरी/बेबटिम:-
राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू विक्री अड्यावर पोलिसांनी छापा टाकात २५०० रूपयांचा दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पो.नि.नंदकुमार दुधाळ यांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री करणा-यांवर धडक कारवाई सुरू केली आहे.त्यामुळे आता अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
वांबोरी ते सडे रोडवर प्रसाद शुगर कारखान्यासमोर अष्टविनायक हाँटेलचे भिंतीचे आडोशाला छापा टाकला असता तेथे १२०० रूपयांचा दारूच्या बाटल्या आढळून आल्याने पो.काॅ. वाल्मीक दादाभाऊ पारधी यांच्या फिर्यादी वरून आरोपी संदिप बाळासाहेब पागीरे वय-२५ वर्षे रा. वांबोरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर येथीलच जवळ असलेल्या श्रीकृष्ण दुकाच्या आडोशाला देखील पोलिसांनी छापा टाकला असता तेथेही १५०० रूपयांचा दारूच्या बाटल्या आढळून आल्या. सदर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असुन पोकाॅ.संतोषकुमार वसंत राठोड यांच्या फिर्यादीवरूण आरोपी रामकिसन माणिक दहिफळे वय-36 वर्षे रा.प्रसाद शुगर कारखाना, वांबोरी ता.राहुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत