मा.मंत्री जानकरांनी केले श्रीरामपूरात चितळकर कुटुंबियांचे सांत्वन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मा.मंत्री जानकरांनी केले श्रीरामपूरात चितळकर कुटुंबियांचे सांत्वन

  श्रीरामपूर/वेबटीम:- राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर यांनी श्रीरामपुर तालुक्यातील वांगी येथील चितळकर कुटुंबियांचे ...

 श्रीरामपूर/वेबटीम:-

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर यांनी श्रीरामपुर तालुक्यातील वांगी येथील चितळकर कुटुंबियांचे सांत्वन केले. कै.संदीप चितळकर यांचं काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले आहे. महादेव जानकर अहमदनगर दौऱ्यावर असताना चितळकर महाराज यांची भेट घेतली कै. संदीपभाऊ एक चांगले मनमिळावू व्यक्तिमत्व हरपले याचं दुःख आहे ह्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी भावना व्यक्त केली यावेळी रासपचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुधांरे, वारकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.मछिंद्र महाराज शास्त्री शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब जगताप  किशोर बाचकर  आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत