सात्रळ/वेबटीम:- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद...
सात्रळ/वेबटीम:-
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथे माजी मंत्री आमदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविताना महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. रमेश पन्हाळे, श्री. रंगनाथ पा.दिघे, श्री. सुभाष पा. अंत्रे, प्र. प्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप,कार्यालयीन अधिक्षक श्री. विलास शिंदे, श्री. महेंद्र तांबे, सर्व स्टाफ व सेवक वृंद उपस्थित होते.
याप्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डाॅ. सोमनाथ घोलप म्हणाले, साहेबांनी प्रवरा कोरोना केअर सेंटरच्या माध्यमातून कोरोना काळात हजारो रुग्णांना मदत व तत्पर सेवा उपलब्ध करून देत त्यांच्या कुटुंबियांना आधारही दिला. जनसेवेची धडाडी आणि सर्वसामान्यांचा कल्पवृक्ष असणाऱ्या आमच्या साहेबांचा वाढदिवस महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून साजरा करताना आम्हाला अभिमान वाटतो.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत