आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शिवसेनेकडून वृक्षारोपण. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शिवसेनेकडून वृक्षारोपण.

कोपरगाव/वेबटीम:- राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या ...

कोपरगाव/वेबटीम:-

राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या आदेशानुसार व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यात शिवसेनेकडून दत्तनगर,गोरोबानगर, टिळकनगर, गांधीनगर,हनुमाननगर,निवारा, सुभद्रानगर, लक्ष्मीनगर,मोहनीराजनगर,बेट,कोर्ट रोड, पांडे गल्ली, सुभाषनगर, शिंगणापूर,मातोश्रीनगर,येवलारोड, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूल, जेऊर पाटोदा अशा विविध शहरी व ग्रामीण भागात वृक्षारोपण करण्यात आले. 

मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत आणि आपल्याला आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या सुचनेनुसार यंदा वाढदिवसानिमित्त कोणताही गर्दी होईल असा कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत "सांसे हो रही है कम आओ पेड लगाये हम " हे ब्रीद वाक्य घेऊन कोपरगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी  कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळून वृक्षारोपण केले. आदित्य ठाकरेंच्या वाढदिसा निमित्त इतर खर्च टाळून वृक्षारोपण केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी उत्सफूर्त सहभाग घेऊन हा स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्दल अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत