जनतेच्या स्मरणात राहणारा विकास करून दाखवणार -आमदार आशुतोष काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जनतेच्या स्मरणात राहणारा विकास करून दाखवणार -आमदार आशुतोष काळे

   कोपरगाव प्रतिनिधी  लोकप्रितिनिधी येतात आणि जातात मात्र कोणत्या लोकप्रतिनिधींनी कोणती विकासकामे केली याचा हिशोब जनतेकडे असतो. काळे परिवारा...

  कोपरगाव प्रतिनिधी

 लोकप्रितिनिधी येतात आणि जातात मात्र कोणत्या लोकप्रतिनिधींनी कोणती विकासकामे केली याचा हिशोब जनतेकडे असतो. काळे परिवाराला मतदार संघातील जनतेने ज्या ज्यावेळी सेवा करण्याची संधी दिली त्या त्यावेळी मतदार संघाचा विकास झाला आहे.हा विकासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या स्मरणात राहील असा मतदार संघाचा विकास करून दाखवणार असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

  कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील गोदावरी नदीवर बांधलेले पूल व बांधलेल्या विविध शासकीय इमारती त्यांच्या विकासकामांची साक्ष देत आहेत. जवळके व परिसरातील गावांसाठी जीवनवाहिनी असलेली उजनी चारी सिंचन योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात पुनर्जीवित करून २०१४ पर्यंत नियमितपणे चालू ठेवली असल्याचे नमूद केले. त्याप्रमाणे मी देखील जवळके व परिसरातील गावांचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांना अपेक्षित असणारे विकासकामे करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

      जवळके ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मला जवळकेच्या सुज्ञ मतदारांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून दिले. त्यावेळी निवडून आलेल्या उर्वरित सदस्यांपैकी प्रत्येक वर्षाला उपसरपंचपदी प्रत्येक सदस्याला संधी देण्याचे ठरले असून त्यानुसार एक वर्षाची मुदत संपल्यामुळे विद्यमान उपसरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्याला विरोधकांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्न आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्याने मार्गी लावत जवळकेचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र विकासकामात नेहमीच राजकारण करणाऱ्या विरोधकांनी राजकारण करून कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या बातम्या प्रसिद्ध करून जवळकेच्या विकासलाच विरोध केला असल्याचे सांगितले.मात्र कितीहि अडथळे आले तरी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळकेचा विकास थांबू देणार नाही.

        सरपंच बाबुराव थोरात

  यावेळी सभापती सौ.पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, सरपंच बाबुराव थोरात, राहुल रोहमारे, रोहिदास होन, देवेन रोहमारे, नंदकिशोर औताडे, किसन पाडेकर, युवराज गांगवे, ज्ञानेश्वर गव्हाणे, विजय कोटकर, सिकंदर इनामदार, राजेंद्र औताडे, राहुल जगधने, शिवाजी थोरात, लक्ष्मण थोरात, गणेश थोरात, बाळासाहेब गव्हाणे, उमेश देवकर, अशोक नेहे, नान नेहे, आनंद भडांगे, सौ.राजश्री थोरात, सुधाकर थोरात, जगन्नाथ शिंदे, राजेंद्र औताडे, गोकुळ पाचोरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अभियंता उत्तमराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत