राहूरी(वेबटीम) महाराष्ट्र राज्य इंजिनिअरिंग कृती समितीच्यावतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आज ऊर्जा व उच्च शिक्षणमंत्री प्राज...
राहूरी(वेबटीम)
महाराष्ट्र राज्य इंजिनिअरिंग कृती समितीच्यावतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आज ऊर्जा व उच्च शिक्षणमंत्री प्राजक्त तनपुरे व राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी ना.तनपुरे व तहसीलदार शेख यांना दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांची अनावश्यक फी पूर्ण माफ व्हावी तसेच ट्यूशन फी मध्ये २०% फी माफ व्हावी.अशी मागणी करण्यात आली.
यावेळी इंजिनिअरिंग कृती समितीचे राहूरी तालुकाध्यक्ष गौरव रमेश मुसमाडे, शुभम शरद होले,गौरव सुखदेव होले,संतोष सुनील वाळुंज, अक्षय बाबासाहेब कराळे ,सोमनाथ संभाजी शिंदे, केतन निभे,साहिल तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत