कुणाच्या हातात देताय पाल्य ? - शाळेच्या की शिक्षकांच्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कुणाच्या हातात देताय पाल्य ? - शाळेच्या की शिक्षकांच्या

  विशेष लेख शाळेचे नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. आपल्या पाल्याला सर्व पालक शाळेत अॅडमिशन घेताना दिसत आहे. आपल्या पाल्याला शाळेत घालताना ...

 विशेष लेख

शाळेचे नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. आपल्या पाल्याला सर्व पालक शाळेत अॅडमिशन घेताना दिसत आहे. आपल्या पाल्याला शाळेत घालताना आपण सर्वांनी हे पाहणे गरजेचे ठरते की आपल्या पाल्याला योग्य शाळेच्या हातात दयायचे कि योग्य शिक्षकांच्या ?

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल का हा काय प्रश्न आहे का ?चांगल्या शाळेत चांगलेच शिक्षक असतात असे प्रत्येक पालक उत्तर देईल. मुलाला शाळेत घालताना किंवा पुढील वर्गात घालताना पालकांसमोर दोनच पर्याय असतात , सरकारी / निमसरकारी शाळा व खाजगी किंवा प्राव्हेट शाळा.तर चला तर आपणही सारासार विचार करू या आपला पाल्य कोणाच्या हातात देणे योग्य राहील शाळेच्या कि शिक्षकांच्या.


१. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती :

सरकारी किंवा निमसरकारी शाळांना फी तर जवळपास नसतेच. एव्हडच काय तर राज्य सरकारे पुस्तके ,पोषण आहार, स्कॉलरशिप, केंद्रीय नवोदय , एनसीसी सारख्या सुविधा पण मुक्त मध्ये देते. 

खाजगी शाळा एखादी व्यक्ती, संस्था, एनजीओ ई चालतात. या शाळांची फी त्यांच्या देणाऱ्या सुविधांवर अवलंबून असतात. प्रत्येक सुविधाचे या शाळा मात्र नक्की पैसे घेते जसे शालेय फी, स्मार्ट क्लास फी, गॅदरींग फी, बस फी ई. या फी तशा ईयत्ते प्रमाणे पण वाढतात. सरकारी किंवा निमसरकारी शाळेत मिळणाऱ्या मुक्त सुविधा येथे नसातात.

त्यामुळे पालकांनी आवश्य आपल्या आर्थिक कौंटुंबिक परिस्थितीचा पण पाल्याला शाळेत घालताना विचार करावा.

स्टेट्स सिम्बॉल म्हणून मोठ्या शाळेत आर्थिक परिस्थिती नसताना सहसा घालू नका.


२. शिक्षकांचा दर्जा :

सरकारी किंवा निमसरकारी शाळेतील शिक्षक हे सरकारी नियमानुसार योग्य शिक्षक होण्यासाठी शैक्षणिक पात्रता पूर्ण करूनच भरती करतात. या शिक्षकांना मुलांच्या अभ्यासाव्यतीरीक्त मुलांच्या मानसशास्त्राने पण ज्ञान शिक्षणात भेटलेले असते. विषयानुसार तज्ञ शिक्षकच शिकवतात. सरकारी नियमानुसार असल्यामुळे पगारही सरकारी असतो. त्यामुळे मुले घडवताना व्यावहारीक दृष्टीकोन न ठेवता उत्तम शिक्षण देण्यावर भर असतो.

खाजगी शाळेतील शिक्षकही त्या शैक्षणिक पात्रतेचे असतातही किंवा नसाताही. कारण या शिक्षकांची भरती शाळेच्या परिस्थितीनुसार किंवा गरजे नुसार होते. बऱ्याचदा अनेक शिक्षक त्या विषयातील तज्ञ नसतानाही विषय शिकवतात. बऱ्याचदा शिक्षकांचा किंवा शाळेचा दृष्टीकोन व्यावहारीकच असतो.

या ठिकाणी पालकांनी अतिशय चाणाक्य असणे गरजेचे आहे कारण पालकांनानंतर आपल्या पाल्यांची बौद्धीक, मानसीक व शाररीक जडण घडण याच शिक्षकांकडून होत असते. 

अनेक शाळांमध्ये त्यांच्या मुख्याध्यापकांपासून तर शिक्षकांचे सर्वाची शैक्षणिक डिग्री एका बोर्डवर लावलेली असते . नसेल तर शाळेत चौकशी अवश्य करा.


३. शाळेचे नियम :

विदयार्थी दशेत असताना नियम असावेच.

सरकारी किंवा निमसरकारी शाळेत शिकणारे विदयार्थी सर्व समाज घटकाचे, आर्थिक परिस्थितीचे असतात . त्यामुळे या शाळांचे मुलांचे ड्रेस कोड, बुट कोड अगदी साधे व परवडणारेच असतात. मुलांनाही अशा साध्या राहिणीमानाची सवय पुढे जाऊन कितीही मोठे झाली किंवा नाही पण सहजतेने वावरताना दिसताना.

सर्व समाज घटक व आर्थिक परिस्थितीतील मुलांमध्ये वावरल्यामुळे मोठ्यापणी पण आपल्या रोजगाराच्या क्षेत्रात सर्व घटकांत सहजतेने मानसिक दृष्टा मिसळताना दिसतात. या मुलांमध्ये सामान्य ज्ञान अशा सर्व घटकांमध्ये परिस्थितीमध्ये मिसळयामुळे नक्कीच जास्त असते.

खाजगी शाळेमध्ये वेगवेगळया वारांसाठी वेगळे ड्रेस कोड, बुट कोड, टाय कोड, कोट कोड . हे सर्व महागडेच. पालकही आपल्या पाल्यासाठी पैशाची मोजमाप न करता सर्व देत असतो. कदाचीत पाल्यांना याची जाणीवही होत नाही व पुढील आयुष्यातही जाणवत नाही.

आपल्या हुशारीने पुढे गेले तरी किंवा नाही तर आपल्या रोजगारात ईतर सर्व समाज घटकांत सहजतेने वाववरताना दिसत नाही.


४. शाळेच्या पायाभूत सुविधा:

सरकारी किंवा निमसरकारी शाळेच्या पायाभुत सुविधा बऱ्याच ठिकाणी अपुऱ्याच असतात. शाळेची ईमारत, पाणी पिण्याची सुविधा, टॉयलेट, खेळाचे मैदान या सर्व ठिकाणी कमतरतातच भासते. शाळेतील वर्ग, शिवण्याचा बोर्ड , बाक ई जूनेच असतात. अनेक मुल आणि त्यांचे पालक या कारणास्तव नाराजच असतात.

खाजगी शाळेमध्ये या वरील सुविधां बऱ्याच ठिकाणी असतात. यामुळे ही बऱ्याचदा मुलांना शाळेत जायला आवडते. अभ्यासाव्यतिरीक्त ईतर कलांगुणांच्या वाढीसाठी पण फी घेऊन वाव देतात .


सारासार विचार: सरकारी व खाजगी कोणतीही शाळा परीपूर्ण नाली. शाळा हे ज्ञानार्जना बरोबर व्यक्तीमत्व विकासाचे केंद्र आहे. योग्य गुरूंकडून हे सर्व घडू शकते. अभ्यासाची व कलागुणांची आवड असणारा विद्यार्थी अगदी रोडवरील लाईट खाली अभ्यास करून डॉ.आंबेडकर किंवा पेपर वाटून शास्त्रज्ञ डॉ कलाम पण होऊ शकतो. आपणच ठरवा आपला पाल्य कुणाच्या हातात देताय ? - शाळेच्या की शिक्षकांच्या...

लेखक- राहुल ठाणगे(राहूरी फॅक्टरी)

9226594565


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत