मायेची सावली देणारा वटवृक्ष अर्थात शिवसेना पक्ष - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मायेची सावली देणारा वटवृक्ष अर्थात शिवसेना पक्ष

शिवसेना वर्धापनदिन विशेष लेख  आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन. १९ जुन १९६६ रोजी स्थापन झालेली ,आज शिवसेना पक्ष ५५ वर्षांचा अनेकांना आधार व मा...

शिवसेना वर्धापनदिन विशेष लेख

 आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन. १९ जुन १९६६ रोजी स्थापन झालेली ,आज शिवसेना पक्ष ५५ वर्षांचा अनेकांना आधार व मायेची सावली देणारा वटवृक्ष बनला आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी  शिवसेनेच्या पहिल्या जाहिर सभेत केलेल्या तेजस्वी कणखर भाषणाने सुरु झालेला झंझावात स्वगीॅय बाळासाहेब , त्यानंतर मा उध्दवजी न् नव महाराष्ट्राची कल्पना मांडणारे आदित्यजी यां चार पिढ्यांनी योगदान देत थेट दिल्ली तख्ताला धडक देत आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरु झालेली ८०% समाजकारण व २०% राजकारण चौथ्या पिढीपर्यत  पोहताना १००% राजकारण त्या बरोबर १००% समाजकारण करण्याची व्यापकता शिवसेना पक्षाने गाठली आहे. राजकारण संवेदनशीलता, प्रामाणिकपणा,अन् अन्यायाप्रती चिडुन उठणारी .प्रसंगी आक्रमक तर तेवढीच गोरगरिबांची कणव असलेली संघटना आज राष्ट्रीय राजकारणांत आपली विश्वासाहार्य प्रतीमा निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.

      अस्मादिकाला शिवसेनेचा प्रवास जवळुन पहाण्याची भाग्य गेली २६ वर्ष मिळाले.गावखेड्यात काम करणारा मी,सर्ससामान्य शिवसैनीक मित्रांचे सहाय्याने केवळ योगायोगाने मुबंईत पोहचलाे,१९९५ ला युती सरकारमध्ये तत्कालीन राज्यमंत्री गुलाबराव गांवडे याचेकडे मी काम सुरु केले.खुप भारलेला व मंतरलेला काळ होता.वाघासारखे जिल्हाप्रमुख व त्यांचे शिवसैनीक बछडे मंत्रालयात यायचे ,केवळ आपल्या कुटुंबातील सद्स्य मंत्र्याचे खुचीॅत बसलेला पाहुन समाधान व्यक्त करत छोटीमोठी काम करुन घेत समाधानी होत असतं,.युती तेंव्हा घट्ट होती एकोपा होता.परंतु अंतर्गत खटके उडायचे.गुलाबरावांनी राजीनामा दिल्यानंतर मी भाजपाचे आण्णा डांगेकडे होतो.तेंव्हा युतीतील शीतयुध्द अगदी जवळुन पाहिले.मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार तसेच मंत्रिमंडळ बैठकीपुवीॅ पुर्व बैठक व कॅबेनेट झाल्यावर पुन्हा बैठक अशी रणनितीच्या बैठका व्हायच्या. .नारायण मुख्यमंत्री झाले मी पुन्हा शिवसेनेच्या उत्तमप्रकाश खंदारेकडे काम करु लागलो.शिवसेनाप्रमुखांशी भेटण्याचा जवळुन पहाण्याचा योग आला.प्रखर तेज न् तेवढीच आपुलकि ,निर्भेळ प्रेम त्यांनी शिवसैनिकांना देत प्रंखर व कट्टर सैनिक घडविले न् मोठे केले. 

      १९९५ ला राजसाहेब सक्रिय दिसायचे.परंतु मा उध्दवसाहेब पडद्यामागे राहुन संघटना अंत्यत शिस्तबध्द पध्दतीने वाढवत होते.नासीकच्या पक्षाचे शिबिरात हातात पॅड कागद पेन घेवुन अंत्यत बारकाईने संघटनेचा आढावा घेताना मी पाहिले आहे.आत्ताचे दक्षीण जिल्हा संपर्कनेते भाऊ कोरगांवकर तेव्हांपासुच त्यांचे विश्वासु ,ते अकोला जिल्हा संपर्क नेते त्यावेळी त्यावेळेस झालेली ओळख आजहि तेवढीच टिकुन आहे. मा उत्तमप्रकाश खंदारेंची पारख करत त्यांना पाठबळ देत आमदार बनवले ३ वेळा. संधी येताच तीनचाकी रिक्षा चालविणारा हा मातंग समाजातील युवक त्यांनी आग्रहाने मंत्रिमंडळात घ्यायला लावला होता.शिवसेना पक्षाची सुत्रे त्यांचे हातात येताच अन्यायाविरुध्द लढणा-या आक्रमक शिवसेनेला विषयावर आधारित कार्यक्रम देत कार्यरत केले. बांधावर जात शेतक-यासाठी काम करण्याचे त्यांनी केलेले जाणीपुर्वक प्रयत्नाने शिवसेना आपली पाळेमुळे ग्रामीण भागांत घट्ट करत गेली.राज ठाकरे , नारायण राणे तसेच गणेश नाईकांसारखे अनेकजण पक्ष सोडुन गेले. भाजपा मित्रपक्षाचे अंर्तगत कुरघोड्या सुरुच होत्या.त्यावर मात करत संयमाने त्यांनी आज राज्याचे सत्तेचे सर्वांच्च पद त्यांनी मिळवले. ते विश्वासाने व संयमाने चालवले.  

       मा शिवसेनाप्रमुखांनी ना आदित्यजींना तलवार देवुन युवासेनेची धुरा त्यांचेकडे दिली. काळ बदलला प्रश्न आव्हाने बदलली.या बदलत्या परिस्थितीनुसार आधुनिक राजकारणाची झलक आदित्यजी यांच्यात दिसत आहे. त्यांचेकडे असलेला पर्यटन विभाग देशात पहिल्या क्रमांकावर त्यांनी नेला आहे. पर्यावरण संवर्धनाचे अनेक कामे केले. प्लॅस्टीक बंदीचा निर्णय त्यांनी घेतला तो देशात अंमलात आला.जनसंवाद यात्रेतुन संपुर्ण महाराष्ट्र ते फिरले. प्रश्न समज़ुन घेतले. १००% राजकारण न् समाजकारण अंत्यत आधुनिक पध्दतीने ते करत आहे. नवमहाराष्ट् निमिॅत्तीच्या त्यांच्या काही संकल्पना आहेत. त्या नक्कीच ते पुढे नेणार .एवढ्या कमी वयाचा परिपक्व राजकारणी देशात नाही ,त्यांची काम करण्याची पध्दत पहाता ते राज्याचे व देशाच्या राजकारणात आपली ओळख नक्कीच ठळक करणार हे मात्र नक्की. 

       गावखेड्यात गळ्यात भगवा उपरणे टाकलेला साधा शिवसैनीकहि जनसामान्याला आधार वाटतो. कोणत्याही प्रश्नाला भिडण्याची तयारी व त्यातील प्रामाणीकता पाहुन इतर कोणत्याही पक्षाचे कार्यकर्त्यांपेक्षा तो वेगळा उठून दिसतो.सरकारी कार्यालयात प्रश्न घेवुन गेल्यावर शिवसैनीक म्हणुन असलेली त्याची ओळख सत्ता नसतानाहि तेवढीच प्रतिष्ठेची होती न् आजहि आहे.या शिवसैनिकांच्या भक्कम नेटवर्कवर शिवसेना टिकुन राहिली न् वाढत राहिली. अनेक धक्के पचवुन ती आज वटवृक्ष बनली आहे. विश्वासु आश्वासक प्रामाणिक संयमी नेतृत्व भविष्यात देशाचे नेतृत्व करेल यात शंका नाही.सर्व शिवसैनीक व शिवसेनाप्रेमींना वर्धापन दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र...

लेखक-

दत्ता पाटील कडू(देवळाली प्रवरा)

मो-9324754196

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत