छत्रपती शिवाजी महाराज विश्वातील आदर्श नेतृत्व - आ. आशुतोष काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

छत्रपती शिवाजी महाराज विश्वातील आदर्श नेतृत्व - आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी  अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श शासन व आदर्श प्रशासन कसे असावे याचा वस्तुपाठ संपूर्ण विश्...

कोपरगाव प्रतिनिधी 

अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श शासन व आदर्श प्रशासन कसे असावे याचा वस्तुपाठ संपूर्ण विश्वाला दाखवून दिला असून त्यांनी निर्माण केलेल्या आदर्श समाजव्यवस्थेची संपूर्ण विश्व प्रेरणा घेत असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज विश्वातील आदर्श नेतृत्व आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

   शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.

 यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, फकीरमामु कुरेशी, रमेश गवळी, बाळासाहेब रुईकर, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, आनंद जगताप, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, नारायण लांडगे, जावेदभाई शेख, संदीप देवळालीकर, हृषीकेश खैरनार, आकाश डागा, ठकाजी लासुरे, गणेश लकारे, विकास बेंद्रे, इम्तियाजभाई अत्तार, मनोज कडु, सागर लकारे, शुभम लासुरे, योगेश वाणी आदी उपस्थित होते.


                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत