कोरोनाशी लढा देतांना मतदार संघाचा विकास थांबू देणार नाही –आ. आशुतोष काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोरोनाशी लढा देतांना मतदार संघाचा विकास थांबू देणार नाही –आ. आशुतोष काळे

कोपरगाव/वेबटीम :- विश्वावर आलेल्या जीवघेण्या कोरोना संकटामुळे संपूर्ण विश्वाला थांबावे लागले. देशात व राज्यात देखील दुसऱ्यांदा लॉकडाऊन करावा...

कोपरगाव/वेबटीम :-

विश्वावर आलेल्या जीवघेण्या कोरोना संकटामुळे संपूर्ण विश्वाला थांबावे लागले. देशात व राज्यात देखील दुसऱ्यांदा लॉकडाऊन करावा लागला. या परिस्थितीचा मतदार संघाच्या विकासावर परिणाम होणार का अशी साशंकता होती. मात्र मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला महाविकास आघाडी सरकारच्या सर्वच विभागाकडून मिळालेल्या सहकार्यातून मतदार संघाचा विकास प्रगतीपथावर आहे. यापुढेदेखील कोरोनाशी लढा देतांना मतदार संघाचा विकास कदापि थांबू देणार नाही अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत २० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या रेलवाडी मारुती मंदिर ते पोपट लोंढे वस्ती रस्ता व महेश लोंढे शेड ते जंगली महाराज इंटरनॅशनल स्कुल रस्ता खडीकरण तसेच सडे येथे पुणतांबा रोड ते वाकचौरे वस्ती रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन व जनसुविधा योजनेतून बांधण्यात आलेल्या सडे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकापर्ण नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते यावेळी शिवस्वराज्य दिनानिमित्त आमदार काळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वराज्यगुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

      यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव मतदार संघ हे माझे कुटुंब आहे. आज कुटुंबापुढे कोरोनाचे संकट आहे अशा परिस्थितीत माझ्या कुटुंबाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरणे हि माझी जबाबदारी आहे. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी योग्य त्या उपाय योजना करून त्याचा परिणाम विकास कामांवर होऊ न देता आजपर्यंत मतदार संघाचा विकास थांबू दिला नाही व यापुढेही थांबणार नाही. मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असलेल्या रस्ते, वीज, पाणी आदी विकासाचे अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके, कोकमठाणच्या सरपंच सौ. उषाताई दुशिंग, उपसरपंच दीपकजी रोहोम, जिनिंग व प्रेसिंगचे संचालक सुदाम लोंढे, सडेचे सरपंच अजित कोताडे, उपसरपंच सुनील बारहाते,विजय रक्ताटे, विजय थोरात, दादासाहेब साबळे, अशोक  रक्ताटे, भास्कर निकम, पोपट लोंढे, महेश लोंढे, प्रसाद साबळे, परसराम रक्ताटे, आबा रक्ताटे, संजय दंडवते, ज्ञानेश्वर रक्ताटे, जालिंदर हाडोळे, बाळासाहेब राऊत, सोपान काशीद, रमेश वाकचौरे, रावसाहेब बारहाते, विजय बारहाते, मुरली वाकचौरे, माणिक बारहाते, गणेश बारहाते, भागवत बारहाते, संतोष बारहाते, सुभाष बारहाते, रामभाऊ बारहाते, नारायण लोहकणे, भानुदास लोहकणे, प्रवीण कोताडे, जालिंदर कुसळकर, केरु आळकोटे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अभियंता उत्तमराव पवार, रावसाहेब शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत