महिला बचत गटांची मदत निधी मंजूर करण्याची मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महिला बचत गटांची मदत निधी मंजूर करण्याची मागणी

  कोपरगाव/प्रतिनिधी कोविडचे संकट अद्यापही टळलेले नसून, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. यामुळे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बंद झा...

 कोपरगाव/प्रतिनिधी

कोविडचे संकट अद्यापही टळलेले नसून, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. यामुळे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत कोपरगाव येथील क्रांती लोकसंचलित स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचा उद्योग बंद पडल्याने मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बचत गटास आर्थिक मदत निधी मंजूर करावा, अशा आशयाचे निवेदन शिवसेनेतर्फे आमदार आशुतोष काळे यांना नुकतेच देण्यात आले आहे.

शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख कलविंदर दडीयाल यांनी आमदार काळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लागू केलेले आहेत. 

त्यातच लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले असून, बचत गटांचेही छोटे-मोठे उद्योग बंद पडल्याने आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आटला आहे. त्यामुळे येथील क्रांती लोकसंचलित स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सदस्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही मुश्किल होत आहे. या पार्श्वभूमीवर बचत व कर्जाचा हफ्ता प्रामाणिकपणे बँकेत जमा करुनही आज अशी वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने सकारात्मक विचार करुन महिला बचत गटास मदत निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

या निवेदनावर भक्ती महिला बचत गटाच्या अध्यक्षा शीतल चव्हाण, करिश्मा मांडगे, संगीता शेळके, ज्योती काटकर, प्रभावती काटकर, मंगल भगत, नंदाबाई पंडोरे, जाकिरा सय्यद, मंगल घोडेराव, अश्विनी शिरसाठ, प्रियंका शिरसाठ, सोनाली धामणे, आशा जवरे, श्रृतिका कानडे आदिंच्या सह्या आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत