कोपरगाव(वेबटीम) साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ आज दिनांक 22 जून रोजी सायंकाळ पर्यंत घोषित होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवाद...
कोपरगाव(वेबटीम)
साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ आज दिनांक 22 जून रोजी सायंकाळ पर्यंत घोषित होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.आशुतोष काळे यांचे नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, कोपरगावात सुरू असलेली फटाके, गुलालाची जय्यत तयारी या सर्व घडामोडींना पुष्टी देणारी ठरत आहे. दरम्यान, विश्वस्त पदासाठी देवळाली प्रवरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत सदस्य अजित कदम यांचे नाव पुढे आलेले दिसत आहे.
२२ जून रोजी शिर्डी संस्थांनचे नवीन विश्वस्त मंडळ निवडी बाबतचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याने सुरुवातीपासून अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व कॉग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.आशुतोष काळे हे पहिल्यापासून आघाडीवर आहेत. तसेच आ.रोहित पवार, आ.निलेश लंके यांचीही नाव चर्चेत होते. मात्र जिल्ह्यातील पक्षातील लॉबीने ताकद लावल्याने तसेच पक्षातील काम पाहून आ. काळे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंतिम झाल्याचे समजते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत संस्थानचे चित्र स्पष्ट होणार आहे. शिवाय, कोपरगावत काळे समर्थकांनी केलेली तयारी पाहता आ काळे यांचे नाव अंतिम असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळत आहे. कोपरगावत फटाके, गुलाल आणि अन्य सर्व तयारी झाल्याचेही एका कार्यकर्त्यांने सांगितले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही अध्यक्षपदासाठी दावा करत असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आ.सुधीर तांबे हे अध्यक्षपदासाठी रेसमध्ये आहेत.
दरम्यान विश्वस्त पदासाठी राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राष्ट्रवादीचे प्रांत सदस्य तथा पवार कुटुंबियांचे नातलग अजित सर्जेराव कदम यांचे नाव विश्वस्त पदासाठी पुढे आले आहे.
राहुरीतून सुरेश वाबळे, रावसाहेब खेवरे, अजित कदम या तिघांची नावे आघाडीवर आहे.येत्या काही तासात शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर होण्याची शक्यता असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत