देवळाली नगरपालिकेच्यावतीने कोरोना काळात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली नगरपालिकेच्यावतीने कोरोना काळात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

  राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपालिकेचे चांगल्या अर्थाने महाराष्ट्रभर नांव निघते. नगर अध्यक्षाचे चांगले कौतुक होते. या चांगल्या नांवा मा...

 राहुरी(वेबटीम)

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे चांगल्या अर्थाने महाराष्ट्रभर नांव निघते. नगर अध्यक्षाचे चांगले कौतुक होते. या चांगल्या नांवा मागे माझे एकट्याचे श्रेय नसून माझे सर्व सहकारी तसेच नगरपालिकेच्या सर्व

कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे आणि सर्व शहरवासियांचे श्रेय असून तो सन्मान मात्र सगळ्यांच्या वतीने मला मिळतो, त्यामुळे माझी छाती फुगते त्यामुळे  नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा  मला अभिमान आहे. कोरोना काळात सर्व कर्मचाऱ्यांनी  चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे कोरोनावर मात करु शकलो असे प्रतिपादन देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित पा. कदम यांनी केले आहे.

  देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने कोरोना काळात काम केलेल्या कर्मचा-यांचा नगरपालिकेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन  नगराध्यक्ष कदम बोलत होते. कदम बोलताना म्हणाले की, देवळाली प्रवरा शहरासह देशात 2020 मध्ये कोरोना सारखा महाभयंकर आजाराने थैमान घातले. गेल्या दोन वर्षापासून देवळाली प्रवरा नगरपालिकेचे कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहे. हा लढा देत असताना कर्मचाऱ्यांनी  चांगले काम केले,  काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांकडून चुका होत असतात, काम न करणाऱ्या कडून   कोणतीच चुक होत नसते कारण तो कामच करत नसतो. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांच्या  चुकांकडे दुर्लक्ष करुन कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले. याचा मला अभिमान आहे. कर्मचाऱ्यांच्या  कामामुळेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे चांगल्या अर्थाने महाराष्ट्रभर नांव निघत आहे. त्याच बरोबर नगराध्यक्ष या नात्याने अनेक ठिकाणी माझे कौतुक होत असते. त्यामुळे स्वत:ची छाती फुगते, छाती फुगण्यामागे कर्मचाऱ्यांनी  केलेल्या कामाची पावती आहे. देवळाली प्रवरा शहरात स्थानिक डॉक्टरांनी कोविड उपचार केंद्र सुरु केले होते. या ठिकाणी अनेकांनी उपचार घेतले. उपचार केंद्रात एकाही रुग्णाचा मृत्यु झाला नाही. यावरुन उपचार केंद्रात योग्य प्रकारे उपचार केले जात होते.देवळाली प्रवरा नगर पालिकेने लसीकरणा पासुन ते घरोघरी जावून रँपिड टेस्ट करण्याचे काम करण्यात पालिका कर्मचारी अग्रभागी आहेत. कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली असल्याने नागरीकांनी विशेत: लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. शासकिय सुचनांचे पालन करुन सहकार्य करण्याचे  आव्हान नगराध्यक्ष कदम यांनी केले.

            नगरपालिकेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अंत्यविधी पथक, भरत साळुंके, सोमनाथ सुर्यवंशी, अमोल पंडीत, सुनिल कल्हापुरे, अशोक पंडीत, बबन शिंदे, रवि गंधमवार, भाऊसाहेब बर्डे, किरण मकासरे यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. 

अंन्टीजन रॅपीड टेस्ट पथक संभाजी वाळके, नानासाहेब टिक़्क़ल, भाऊसाहेब पठारे, नंदु शिरसाठ, संतोष अवसरकर, पांडुरंग कांबळे, डॉ. कृष्णा वायदंडे, डॉ. ऋषीकेश गडाख, कृष्णा महांकाळ, रोहीत पंडीत देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी अजित निकत आदिंचा सन्मान करणेत आला.

                 यावेळी उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, माजी उपाध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेविका संगिता चव्हाण, सुजाता कदम नगरसेवक आदिनाथ कराळे, बाळासाहेब खुरुद, ज्ञानेश्वर वाणी, अमोल कदम, भारत शेटे, सागर खांदे, एकनाथ बनकर, सचिन सरोदे आदी उपस्थित होते.

              कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुनिल गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल कदम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत