वनप्रस्थ फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वनप्रस्थ फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर घोटी रस्त्याला सोंनाबे गावातील जय भवानी माता मंदिरासमोरील डोंगरावर वनप्रस्थ फाउंडेशन च्या वतीने रविवार दिनांक २७ जू...



नाशिक जिल्ह्यातील सिन्नर घोटी रस्त्याला सोंनाबे गावातील जय भवानी माता मंदिरासमोरील डोंगरावर वनप्रस्थ फाउंडेशन च्या वतीने रविवार दिनांक २७ जून २०२१ रोजी सिन्नर च्या प्रांतधिकारी श्रीमती पूजा गायकवाड यांच्या शुभहस्ते देशी व सदैव ऑक्सिजन देणाऱ्या सुमारे ३००० वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 

    यावेळी कोपरगाव येथील गोदामाई  प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ  ढाकणे वनप्रस्थ फाउंडेशन, सिन्नर टीमचे अभिजित देशमुख , अनिल जाधव, डॉ महावीर खिंवसरा,दत्तात्रय बोऱ्हाडे, अतुल मिसळ,सोपान बोडके, राजेंद्र क्षत्रीय ,संजय पवार, सचिन आडणे,संदीप आहेर, सचिन कासार,सुनील विशे, आप्पा विशे,गौरव आंबेकर  तसेच कोपरगाव नगरपालिकेचे महारुद्र गालट, तसेच परिसरातील लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी वनप्रस्थ फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले की,आम्हीं सर्व सदस्य गेल्या चार वर्षांपासून या डोंगरावर वृक्षारोपण करत असून त्याची निगा देखील घेत आहे भविष्यात हा डोंगर आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण जंगलमय करणार आहे.

 यावेळी प्रांतधिकारी श्रीमती गायकवाड यांनी वनप्रस्थ फाऊंडेशनचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत सर्व नागरिकांनी किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले, यावेळी गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष ढाकणे यांनी वनप्रस्थ फाउंडेशन करत असलेल्या  कार्याबद्दल सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत