अंमळनेर येथे बिबट्याने मध्यवस्तीत घुसून पाडला शेळीचा फडशा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अंमळनेर येथे बिबट्याने मध्यवस्तीत घुसून पाडला शेळीचा फडशा

  आंबी (वेबटीम) राहुरी तालुक्यातील अंमळनेर येथे मध्यवस्तीत धुमाकूळ घालत ज्ञानदेव गंगाधर जगताप या शेतकऱ्यांची शेळी ठार केल्याची दुर्दैवी घटना...

 आंबी (वेबटीम)

राहुरी तालुक्यातील अंमळनेर येथे मध्यवस्तीत धुमाकूळ घालत ज्ञानदेव गंगाधर जगताप या शेतकऱ्यांची शेळी ठार केल्याची दुर्दैवी घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. जगताप यांनी घराशेजारी गोठ्यात बांधलेली शेळी बिबट्याने संरक्षक जाळी उचकटून शेजारील ऊसाचा शेतात ओढून नेली. यामुळे जगताप यांचे सुमारे पंधरा हजाराचे नुकसान झाले आहे. 

       प्रवरा परिसरात बिबट्यांच्या मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. शेतात काम करताना, रस्त्याने फिरणाऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. बेलापूर, केसापूर, आंबी, अंमळनेर हा भाग बागायती पट्टा असल्याने ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी आयते घर मिळते आहे. बिबटे मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे, कुत्री या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना भक्ष्य बनवीत आहेत. गेल्या काही दिवसांत परिसरात मनुष्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने या नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अंमळनेरचे सरपंच भारत जाधव, उपसरपंच किरण कोळसे,   ग्रामपंचायत सदस्य दादा साळुंके, कोंडीराम साळुंके, रोहण जाधव, रवी पाळंदे, नंदकिशोर जाधव, आंबीचे सरपंच बाळासाहेब साळुंके, उपसरपंच विजय डुकरे ग्रामपंचायत सदस्य सुनिल लोंढे, पत्रकार विश्वनाथ जाधव, सुभाष डुकरे, भिम कोळसे, संदिप साळुंके, रावसाहेब फुलमाळी, गणेश कोळसे, पोलिस पाटील सुरेश जाधव, बाळासाहेब लोंढे, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे, प्रताप जाधव, सुनिल औताडे यांसह प्रवरा पंचक्रोशीतुन होत आहे.

"परिसरात बिबट्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना चिंतेत टाकणाऱ्या आहेत. वन विभागाने परिसरात पिंजरे लावावी अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांनी स्वतःची, कुटुंबाची व पशुधनाची काळजी घ्यावी. अंमळनेर ग्रामपंचायत मार्फत वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल."

किरण कोळसे (उपसरपंच अंमळनेर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत