कोंढवड येथे मृत अवस्थेत आढळला बिबट्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोंढवड येथे मृत अवस्थेत आढळला बिबट्या

  कोंढवड(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कोंढवड शिवारात उसात नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान कोंढवड शिवारात दत्तात्रय बाळकृष्ण म...

 कोंढवड(वेबटीम)

राहुरी तालुक्यातील कोंढवड शिवारात उसात नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.

दरम्यान कोंढवड शिवारात दत्तात्रय बाळकृष्ण म्हसे या शेतकऱ्याच्या उसात आज सकाळी त्यांचा मुलगा संदिप हा उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेला असता उसाच्या सरी मध्ये त्याला मृत बिबट्या दिसला. त्याने जवळ जाऊन पाहिले असता तो बिबट्या मयत असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ वन खात्याला कळविल्यानंतर वनविभागाचे पवन निकम व गोरक्षनाथ मोरे  हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरीला रवाना केला.


यावेळी भागवत म्हसे, शिवाजी औटी, श्रीकांत म्हसे, रंगनाथ म्हसे, बबलू औटी, पंडीत हिवाळे, अशोक म्हसे,गोरक्षनाथ म्हसे, भाऊ औटी, योगेश हिवाळे, गणेश हिवाळे, क्षितीज हिवाळे, भैय्या म्हसे, दत्तात्रय हिवाळे, आदींनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत