आरडगाव मानोरी शिवरस्ता ते बोबडे वस्ती रस्त्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पाविञ्यात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरडगाव मानोरी शिवरस्ता ते बोबडे वस्ती रस्त्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पाविञ्यात

राहुरी/वेबटिम राहुरी तालुक्यातील आरडगाव मानोरी शिवरस्ता ते बोबडे वस्ती या रस्त्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून काम रखडले असल्याने पहिल्याच पाव...

राहुरी/वेबटिम

राहुरी तालुक्यातील आरडगाव मानोरी शिवरस्ता ते बोबडे वस्ती या रस्त्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून काम रखडले असल्याने पहिल्याच पावसात या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. म्हणून या कामासाठी तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा  लाभधारक शेतकर्यांनी दिला आहे.

      सुमारे दोन किलोमीटर अंतराचा या रस्त्यांचे काम गेल्याअनेक वर्षांपासून झालेले नसून पावसाळ्यात या रस्त्याची प्रंचंड दुरावस्था होते.त्यामुळे शेतक-यांना दळणवळणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन या रस्त्याकडे जाणुन बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप लाभधारक शेतक-यांनी केला आहे. लवकरच या रस्त्याच्या दुतर्फा साईड गटारे घेऊन रस्त्यावर निदान खडीकरण तरी करणे गरजेचे आहे .त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी या समस्याकडे गांभीर्याने लक्ष घालुन हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा रवींद्र वने, आशोक शेळके, सुभाष चौधरी, चंद्रकांत ढेरे,गणेश साळुंके, रामेश्वर साळुंखे,संभाजी वने, गणेश बोबडे,महेश आढाव, भारत गुंजाळ,संजय शेळके,  गोरक्षनाथ शेळके, बाळासाहेब शेळके,संदिप शेळके, सुनिल गुंजाळ, सुधीर गुंजाळ,कुशाबापु ढेरे,गोविंद ढेरे आदिंनी दिला आहे.

या रस्त्या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली आसताना तुमच्या रस्त्याचे काम मंजुरी साठी पाठविले आहे. मंजुरी आली की काम सुरु करु आशी चार वर्षांपासून उडवाउडवीची उतरे देऊन वेळी मारुन नेण्याचे काम या  सत्ताधारी मंडळीकडून केले जात आहे. गेल्या चार वर्षांत धड एक काम रस्त्याचे निट झाले नाही या ग्रामपंचायत पदाधिकार्यांन कडून 

   दत्तात्रय सांळुके (शेतकरी)

 हा रस्ता खुप जुना आहे या रस्त्याची नकाशात नोंद आसताना वेळोवेळां आम्ही दोन्ही पार्टीच्या कानावर या संदर्भात पाटपुरावा केला माझा जन्म झाल्यापासून या रस्त्यावर एका  साधा खडा देखील टाकला नाही.

       भास्कर वने

गेल्या दोन पंचवार्षिक कालावधीत  ग्रामपंचायतीवर किशोर वने आणि रविंद्र म्हसे यांच्याकडे एकहाती सत्ता होती. आता या प्रभागातुन विरोधी सदस्य सुनिल मोरे हे निवडून आलेले आहेत.पुर्वीच्या सत्ताधा-यांकडे आणि आता या सत्ताधा-यांकडे वेळोवेळी आम्ही रस्त्याची मागणी केली आहे.तरी अद्याप काम मार्गी लागले नाही 

    भाऊसाहेब आढाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत