पानेगाव( वार्ताहर) – नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील पानेगाव, करजगाव, अंमळनेर,वाटापूर,तामसवाडी, शिरेगाव,खेडलेपरमानंद आदी गावांत ग्राम...
पानेगाव( वार्ताहर) –
नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील पानेगाव, करजगाव, अंमळनेर,वाटापूर,तामसवाडी, शिरेगाव,खेडलेपरमानंद आदी गावांत ग्रामपंचायत कार्यालय तसेच पानेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भगवा ध्वजाची गुढी उभारून मोठ्या उत्साहात शिवाजीमहाराज शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.
पानेगाव येथे लोकनियुक्त सरपंच,मुळाचे संचालक संजय पाटील जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप, उपसरपंच रामभाऊ जंगले ,मुळाचे संचालक रंगाभाऊ जंगले, सुनिल भाऊ गडाख मित्र मंडळाचे किशोर जंगले पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे,ग्रामविकास अधिकारी गणेश डोंगरे, पाणीपुरवठा अधिकारी सुनील चिंधे, बाबासाहेब शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य संजय वाघमारे, भाऊसाहेब काकडे, ज्ञानदेव गुडधे, संदिप जंगले, सतिश जंगले, बाबासाहेब गुडधे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले,तानाजी गायकवाड, जनार्दन जंगले, गणेश जंगले, गुलाब गायकवाड विशाल जंगले डॉ काकडे, जगन्नाथ जंगले आदी उपस्थित होते.तर तामसवाडी येथे ग्रामपंचायतच्या वतीने लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत जगताप, उपसरपंच शोभा फोफसे तंटामुक्ती अध्यक्ष देविदास जगताप पोलीस पाटील, रमेश फोफसे ,ग्रामविकास अधिकारी गणेश डोंगरे आदींसह ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
सकाळी जिजाऊंच्या लेकी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची रांगोळीचे चित्र सौ.सुनिता सोनवणे,सौ.ज्योती गायकवाड, वैष्णवी सोनवणे यांनी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंच धातूच्या मूर्तीस पंचामृताचा अभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले.स्वराज्याचे निशाण भगवा ध्वज उभारून वंदन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो शिवराज्याभिषेक सोहळा राज्यात ग्रामपंचायत स्तरावर आयोजन केले ते खरंच प्रेरणादायी आहे.
.. तामसवाडी सरपंच- चंद्रकांत जगताप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करुन भविष्यात निश्चितच गावा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचाराने मावळे तयार होवून ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी आठरा पगड तसेच बारा बलुतेदार बरोबर घेवून स्वराज्याची स्थापना केली तसेच प्रकार एकोप्याने राहून राज्य तसेच देश समृद्ध बनेल.
किशोर जंगले
अध्यक्ष ,सुनीलभाऊ गडाख मित्र मंडळ


कोणत्याही टिप्पण्या नाहीत