कोपरगाव(वेबटीम) दोन तीन महिन्यापासून सुरू असलेला लॉक डाऊन संपवला असला तरी बेशिस्त वर्तन करणारवर प्रशासनाने लक्ष ठेवावे असे आवाहन लोक स्वराज्...
कोपरगाव(वेबटीम)
दोन तीन महिन्यापासून सुरू असलेला लॉक डाऊन संपवला असला तरी बेशिस्त वर्तन करणारवर प्रशासनाने लक्ष ठेवावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, गेल्या एक ते दीड वर्षांपासून देशभर करोना साथी चा कहर सुरू आहे त्यामुळे साथीच्या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला कडक लॉक डाऊन करावे लागले. मागील दुसऱ्या लाटेत अनेकांना वैद्यकीय मदती अभावी आपले जीव गमवावे लागले तसेच लॉक डाऊन मुळे सर्वच उद्योग व्यवसाय बंद झाल्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आता कुठे साथीच्या आजाराचे प्रमाण कमी झाले आहे.
त्यामुळे प्रशासनाने लॉक डाऊन उठवण्याचा निर्णय घेऊन सर्व सामान्य जनतेस दिलासा दिला आहे मात्र आजून देखील तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहे असे असताना लॉक डाऊन उठल्याने सर्व व्यवहार सुरळीत होणार असले तरी प्रशासनाने व जनतेने मास्क न वापरणे,जास्त गर्दी होऊ नये,तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन काळजी घेणे आवश्यक आहे तसेच बेशिस्त वर्तन करणारावर पोलीस व महसूल प्रशासनाने लक्ष ठेवावे व जनतेला दिलासा द्यावा व तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सावध राहावे असे आवाहन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत