नेवासा(वेबटीम) तालुक्यातील भेंडा येथे बस स्टँड चौकात पाच जून रोजी सकाळी दहा वाजता केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांची होळी करण्यात आली भ...
नेवासा(वेबटीम)
तालुक्यातील भेंडा येथे बस स्टँड चौकात पाच जून रोजी सकाळी दहा वाजता केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांची होळी करण्यात आली भारतीय किसान संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्यावतीने कॉम्रेड बाबा आरगडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांच्या प्रति जाळण्यात आल्या व भारतीयपातळीवरील प्रमाणाप्रमाणे इशारा दिवस पाळण्यात आला.
कृषिशास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी स्वामिनाथन समितीच्या शेतमालाच्या भावा संदर्भातील शिफारशीची या कृषी कायद्यात तरतूद नसल्याबद्दल सुखदआश्चर्य व्यक्त करून कृषी मालाचे हमीभाव तातडीने जाहीर करावे अशी मागणी केली.अँड. बन्सी सातपुते यांनी बियाणे व खते तसेच शेती अवजारे जी एस टी मधून मुक्त करून दुधाला रुपये35 प्रतिलिटर भाव द्यावा अशी जोरदार मागणी केली. कॉ.बाबा आरगडे यांनी केंद्र सरकार व घणाघाती टीका करून कामगार व शेती शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला.
शेतकरी बंधूनी मास्क लावून सर्व कोरूना चे काटेकोरपणे नियम पाळले. या आंदोलनात होळी पेटल्यानंतर घोषणांनी परिसर दणाणून गेला. याप्रसंगी कॉम्रेड आप्पासाहेब वाबळे, गणेश खरात, बाबासाहेब सोनपुरे, दत्ता गोंधळी, कॉम्रेड फटांगरे ,दत्ता देवरे, कॉम्रेड भारत अरगडे यांनी आंदोलनाचा समारोप करून जनजागृतीबद्दल कार्यकर्त्यांनी जागृत राहावे असे आवाहन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत