को-केअर ॲपचे माध्यमातून तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

को-केअर ॲपचे माध्यमातून तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल

कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोविड आणि कोविड व्यतिरिक्त आजारांवर इत्यंभूत माहिती देणारा को-केअर ॲपचे माध्यमातून तिसरी लाटे...

कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोविड आणि कोविड व्यतिरिक्त आजारांवर इत्यंभूत माहिती देणारा को-केअर ॲपचे माध्यमातून तिसरी लाटेत कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल.कु.मनस्वी आढाव हिने को-केअर ॲपचे निर्मितीतून कोविड हाॅस्पिटल आणि रुग्णसेवेशी निगडित इतर माहितीचे नागरिकांना उपलब्ध केलेले दालन कौतुकास्पद असल्याचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील कु.मनस्वी मंदार आढाव या १२ वर्षांच्या लहान मुलीने कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय सेवेची माहिती देणारा को-केअर ॲप तयार केला आहे.

या ॲपचे लोकार्पण शिर्डी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर,कु.मनस्वीची आजी प्रगतशील शेतकरी सौ.रंजनाताई आढाव, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके,मंदार आढाव,सौ.जान्हवी आढाव,कु.राजहंस आढाव उपस्थित होते.


कु.मनस्वी ही कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष व मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष अॅड.शंकरराव आढाव यांची नात असून प्रसिद्ध उद्योजक वैभवराव आढाव यांची पुतणी आहे.


कु.मनस्वी हीने सदर ॲप तयार करतांना एक महिना माहिती संकलन आणि मेहनत घेतली आहे.या कामात कु.मनस्वी हीस हैदराबाद येथील व्हाईट हॅट ज्युनिअर मार्गदर्शक शिक्षिका मोनिका सिंग, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत