राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा(गणपती चौक) येथील भूमिपुत्र जालिंदर भीमा धनवडे यांना अहमदनगर येथे रेल्वे पोलीस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक...
राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा(गणपती चौक) येथील भूमिपुत्र जालिंदर भीमा धनवडे यांना अहमदनगर येथे रेल्वे पोलीस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे.
जालिंदर धनवडे यांचे माध्यमिक शिक्षण राहूरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे पूर्ण झाले. त्यांनतर राहूरी महाविद्यालयात पुढील शिक्षण पूर्ण केले. सन १९९९ मध्ये रेल्वे भरती झाल्यानंतर सुमारे २२ वर्षे रेल्वे पोलिस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवा केली. त्यांना नुकतेच सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली असून अहमदनगर येथे रुजू झाले आहेत.
त्यांच्या या बढतीबद्दल नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, भारत शेटे, दत्तात्रय मोरे, सागर खांदे यांनी सन्मान केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत