राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी पुन्हा एकदा कसली कंबर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी पुन्हा एकदा कसली कंबर

  राहुरी/वेबटीम:- कोरोना काळात  शासकीय  कार्यालये पन्नास टक्के कर्मचारी यांचे उपस्थितीत सुरू असल्याने अनेक  नागरिकांचे कामे प्रलंबित राहीले ...

 राहुरी/वेबटीम:-

कोरोना काळात  शासकीय  कार्यालये पन्नास टक्के कर्मचारी यांचे उपस्थितीत सुरू असल्याने अनेक  नागरिकांचे कामे प्रलंबित राहीले आहेत.परंतु 7 जुन पासुन संपुर्ण राज्यात   लॉकडावुन हटविण्यात आल्याने शासकीय  कार्यालयात  वाढती गर्दी लक्षात  घेता राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन  शेख यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

उपविभागीय  अधिकारी डॉ दयानंद जगताप यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यालयीन बैठकीत तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी सर्व  अधिकारी,कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना रस्ता,कुळकायदा केसेस,शिधापत्रिकांचे प्रलंबित  कामे,विद्यार्थ्यांचे दाखले,निराधार योजनेचे अर्ज,जुने सातबारा व फेरफार, टपालाच्या नोंदी यासह सर्व  कामाचा निपटारा करण्याच्या सुचना करण्यात  आल्यात.या बैठकीत नायब तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार पुनम दंडीले,अण्णासाहेब डमाळे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थितीत  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत